प्रवीण पाटील चिखलीकर यांच्या वाढदिवसानिमित्त कंधार येथे कीर्तन सोहळ्याचे आयोजन

कंधार; प्रतिनिधी

भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सरचिटणीस तथा जिल्हा परिषद सदस्य प्रवीणपाटील चिखलीकर यांच्या वाढदिवसानिमित्त ह भ प श्री ज्ञानेश्वर माऊली पठाडे समाजप्रबोधनकार यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम कंधार येथे आयोजित करण्यात आला आहे.


जिल्हा परिषद सदस्य तथा भजपा जिल्हा सरचिटनिस प्रवीणपाटील चिखलीकर यांच्या वाढदिवसानिमित्त कंधार शहरात विविध सामाजिक ,शैक्षणिक उपक्रमासह धार्मिक कार्यक्रम,रक्तदान शिबिरा चे आयोजन करण्यात आले आहे दिनांक ४ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता नगरेश्वर मंदिर मंगलकार्यालय कंधार येथे ह भ प समाज प्रबोधनकार श्री ज्ञानेश्वर माऊली पठाडे यांच्या कीर्तनाचा कीर्तन सोहळा व अभिष्टचिंतन सोहळा कंधार येथे आयोजित करण्यात आला आहे ,त्याचबरोबर विविध सामाजिक उपक्रम शैक्षणिक उपक्रम ही करण्यात येणार आहेत

तर शहरात विविध ठिकाणी अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन ही करण्यात आले आहे,तर भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा च्या वतीने प्रवीण पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे या कीर्तन सोहळ्यास सर्व कंधार लोहा तालुक्यातील जनतेने उपस्थित राहावे असे आव्हान कृषी उत्पन्न बाजार समिती लोहाचे माजी सभापती बालाजी पाटील मारतळेकर, भाजपचे प्रदेश कार्यकारणी सदस्य बाबुराव केंद्रे, माजी नगरसेवक कृष्णा पापीनवार,सरपंच बालाजी झुंबाड ,भाजपचे तालुकाध्यक्ष भगवान राठोड, भाजपचे शहराध्यक्ष गंगाप्रसाद यन्नावार, महिला मोर्चाच्या तालुकाध्यक्षा जयमंगला औरदकर,उपनगराध्यक्ष जफारोद्दीन बाउद्दीन, युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष निलेश गौर, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष साईनाथ कोळगिरे यांनी उपस्थित राहण्याचे आव्हान केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *