कंधार: प्रतिनिधी
प्रियदर्शिनी नगर,सिध्दार्थ नगर व रामरहिम नगर,ही शासकीय वसाहात आहे,या वसाहतीतील काही निकामी विद्युत खांबे पुर्णपणे घरावर झुकलेल्या अवस्थेत झाल्यामुळे ते कधीही घरावर पडू शकतात, अतिवृष्टीमुळे निकामी विद्युत पुरवठा नसलेले खांबे केव्हाही पडून घराचे आर्थिक नुकसान व कोणाच्या जीवितास धोका निर्माण होऊ शकतो, यासाठी येथील नागरीकांनी उपयोगात नसलेले काही निकामी विद्युत खांबे काढण्यासाठी उपकार्यकारी अभियंत्यांकडे एका निवेदनाद्वारे मागणी केली आहे.
या निवेदनावर केकाटे,कासिम मुसा निजामधोंगडे, चांदू गोविंद यमुलवाड, हरी दाऊ नागलवाड,शिवाजी नळगे, संभाजी कांबळे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.