अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांनी शैक्षणिक कर्ज योजनेचा लाभ घ्यावा – एमआयएम तालुका अध्यक्ष मोहम्मद हामेदोद्दिन अहेमदोद्दिन

कंधार / प्रतिनिधी राज्यातील अल्पसंख्याक समाजाच्या शैक्षणिक उन्नतीसाठी मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थीक विकास महामंडळातर्फे उच्च शिक्षणासाठी शैक्षणिक कर्ज योजना नवे शैक्षणिक २०२२-२३ आता सुरु होत आहे . अल्पसंख्यांक समाजातील व्यावसायीक अभ्यासक्रमाचे शिक्षण घेणा – या विद्यार्थ्यांना मौलाना आझाद अल्पसंख्यांक आर्थिक विकास • महामंडळाकडुन ७ लाख ५० हजार रुपया पर्यंत शैक्षणिक कर्जाची योजना सुरु आहे . या योजनेच्या लाभासाठी इच्छुक पात्र विद्यार्थ्यांनी अर्ज करावेत , असे आवाहन एम . आय . एम . तालुका अध्यक्ष मोहम्मद हामेदोद्दिन अहेमदोद्दिन यांनी केले आहे .

केंद्र शासनाच्या डॉ.ए.पी.जे अब्दुल कलाम शैक्षणिक कर्ज योजनेतून ७ लाख ५० हजार रुपयां पर्यंत शैक्षणिक कर्ज मिळु शकते . या योजनेच्या लाभासाठी विद्यार्थ्याचे वय १६ ते ३२ वर्षे असावे , तसेच कौटुंबीक वार्षीक उत्पन्न मर्यादा शहरी भागासाठी १ लाख २० हजार रुपयां पेक्षा कमी तर ग्रामीण भागासाठी ९ ८ हजार रुपयां पेक्षा कमी असावी . राज्य शासना मार्फत मौलाना आझाद शैक्षणिक कर्ज योजना राबविण्यात येत असुन या मधुन ५ लाख रुपयां पर्यंत कर्ज देण्यात येते या योजनेच्या लाभासाठी विद्यार्थ्यांचे वय १८ ते ३२ वर्षे असावे , तसेच कौटुंबीक वार्षिक उत्पन्न मर्यादा ८ लाख रुपयांपर्यंत असावी , अशा अटी आहेत , दोन्ही शैक्षणिक कर्ज योजनांसाठी व्याजदर फक्त ३ टक्के इतका आहे . विद्यार्थ्याने शिक्षण पुर्ण झाल्यानंतर सहा महिण्या पासुन पुढभ्ल ५ वर्षात कर्जाची परतफेड करायची आहे योजनेच्या लाभासाठी . malms.maharashtra gov.in या लिंकवर अर्ज करावा . अधिक माहितीसाठी अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळाच्या https://mamfdc.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर जिल्हास्तरीय कार्यालयाची तसेच योजनेची माहिती उपलब्ध असुन या संकेतस्थळावरुन ऑनलाईन अर्जही करता येईल व राज्यस्तरावर महामंडळाच्या ओल्ड कस्टम हाऊस , फोर्ट , मुंबई येथील कार्यालयात संपर्क साधावा किंवा ०२२-२२६५७९ ८ या क्रमांकावर संपर्क साधावा , असे आवाहन एम.आय.एम.चे तालुका अध्यक्ष मोहम्मद हामेदोद्दिन अहेमदोद्दिन यांनी केले आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *