फुलवळ मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी विश्वांभर बसवंते तर सचिवपदी शादुल शेख..

फुलवळ ( धोंडीबा बोरगावे )

अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेशी संलग्न असलेल्या मराठी पत्रकार संघ फुलवळ ची ता. १४ ऑगस्ट रोजी मावळते अध्यक्ष परमेश्वर डांगे यांच्या अध्यक्षतेखाली महत्वाची बैठक घेण्यात आली. या बैठकीत नवनिर्वाचित कार्यकारणी जाहीर करण्यात आली. यात सर्वानुमते अध्यक्षपदी विश्वांभर बसवंते यांची तर सचिवपदी शादुल शेख यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

मराठी पत्रकार संघाच्या कार्यकारणीचा दोन वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झाला असल्याने ता. १४ ऑगस्ट रोजी एक महत्वपूर्ण बैठकीचे आयोजन करून नवीन कार्यकारणी निवड करण्यात आली.

या बैठकीत खेळीमेळीच्या वातावरणात अध्यक्ष म्हणून विश्वांभर बसवंते तर सचिव म्हणून शादुल शेख यांच्याबरोबरच कार्याध्यक्षपदी दिगंबर डांगे , कोषाध्यक्षपदी परमेश्वर डांगे , सल्लागार म्हणून धोंडीबा बोरगावे यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली. तर सदस्य म्हणून मधुकर डांगे व ऍड उमर शेख हे असणार आहेत.

या नवनिर्वाचित कार्यकारणीचा सत्कार करून त्यांना पुढील कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *