मुंबई –
दहिसर येथील निर्भीड, रोखठोक, कर्तृत्ववान नेतृत्व मुंबई महिला प्रदेशाध्यक्षा सीमा गायकवाड तांबे यांची फेरनिवड करण्यात आली आहे. तर आयटीप्रमुखपदी भांडूपच्यास्नेहल सोहनी यांची निवड करण्यात आली आहे. वंचितचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्या स्वाक्षरीनिशी जारी करण्यात आलेल्या नियुक्तीपत्राद्वारे मुंबई जिल्हा महिला कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे.
या कार्यकारिणीत तीन महिला जिल्हाध्यक्षांचीही निवड करण्यात आली असून उर्वरित कार्यकारिणी पुढीलप्रमाणे :
उपाध्यक्ष -मनीषा मयेकर (वडाळा), महासचिव- शुभलक्ष्मी सावंत (मुलुंड), सचिव – अस्मिता जाधव (वरळी), शताब्दी कांबळे (गोवंडी), संघटक – नूतन काटे (घाटकोपर), सदस्य – दिपाली तेंडोलकर (कांदिवली), आशा गायकवाड (बोरीवली), अॅड. वैशाली दुनबळे (सायन कोळीवाडा), प्रभा रोकडे (अंधेरी), जिल्हाध्यक्षा : १.उत्तर मध्य – कृतिका जाधव ( वाकोला), २. ईशान्य – सुनीता गायकवाड (घाटकोपर), ३. दक्षिण मध्य – जयश्री गायकवाड (चेंबूर).