अन्यायाला वाचा फोडून मातंग समाजाच्या नेत्यांचे ऐक्य घडवण्याचा निर्धार

पुणे ;

सद्या राज्यामध्ये सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक आणि राजकीय ही अशा सर्वच क्षेत्रात लोखसंख्येने जास्त असूनही मातंग समाजाला जाणीवपूर्वक दुर्लक्षित,वंचित,आणि सामाजीक घटकापासुण दुर ठेवला गेला आहे,

अशी या समाजातील घातक परिस्थिती समाजातील पाहता सर्वपक्षीय व संघटनांच्या नेत्यांनी आरोप केला आहे.

त्यासाठी राज्यभर अन्यायाला वाचा फोडून मातंग समाजाच्या नेत्यांचे ऐक्य घडवण्याचा निर्धार आज झालेल्या राज्यस्तरीय बैठकीत सर्वांनुमते मातंग समाज पक्ष, संघटना प्रमुखांच्या उपस्थितीत करण्यात आला.यावेळी राज्य आणि केंद्रीय स्तरावरील विविध प्रश्न सोडविण्यात येणार आसुन,यातच समाजाची अस्मिता लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना “भारतरत्न” घोषित करण्यासाठी समाज प्रचंड आग्रही होत आहे.

याची दखल या बैठकीत घेण्यात आली.आज या समाजात खूपच गंभीर स्थिती आहे. नोकऱ्यांमध्ये सर्वात कमी आहे शिवाय आरक्षणाचा फायदा घेऊ न शकणारा समाज अशी ओळख, त्यामुळे या समाजाला स्वतंत्र आरक्षणाची मागणी बऱ्याच वर्षापासून होत आहे.

त्यासाठी “अबकड” वर्गीकरण करून आरक्षण मिळावे तसेच विधानसभा अस्तित्वात आल्यापासून या समाजाला आज पर्यंत राज्यपाल नियुक्त विधानपरिषद सदस्यत्व मिळाले नाही. त्यासाठी ही राज्यभर जागृती करण्यात येत आहे.
बऱ्याच वर्षापासून रखडलेले

मुंबई येथील अण्णा भाऊ साठे यांचे राष्ट्रीय स्मारक,लोकमान्य टिळक, वासुदेव बळवंत फडके, महात्मा फुले यांचे आद्यक्रांन्ती गुरू लहुजी वस्ताद साळवे यांचे संगमवाडी येथील राष्ट्रीय स्मारकाचा प्रश्न, मातंग समाजातील बेरोजगार आणि गरीब, गरजूंना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी निर्माण केलेले लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ गेल्या काही वर्षापासून बंद स्वरूपात आहे.

मातंग समाजाच्या विकास न होण्यामागे असणारी कारणे आणि विकास होण्यासाठी शिफारस करणारे लहुजी वस्ताद साळवे अभ्यास आयोग नेमला त्याने शिफारसी ही केल्या परंतु अजुन त्या अंमलात आणल्या गेल्या नाही. त्याच बरोबर बार्टी च्या धर्तीवर आर्टी ची स्थापना करावी.

यासह समाजच्या विकासासाठी व समाज्यावर होत आसलेला अन्याय दूर करण्यासाठी विविध प्रश्न घेऊन राज्यभर विविध पक्ष संघटना यांचे नेते आणि कार्यकर्ते एकत्र करण्याचा संकल्प आज या वेळी करण्यात आला. यासाठी राज्यभर बैठक, सभा,आंदोलन याद्वारे समाज एकत्र करण्याची राज्यव्यापी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

तसेच वरील मागण्या मान्य करून घेण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन राज्यव्यापी लढा उभारण्याचा संकल्प यावेळी सर्वांनी केला.

यावेळी राज्यव्यापी बैठकीचे अध्यक्ष मातंग समाजाचे नेते माजी मंत्री.रमेश बागवे होते, दलीत महासंघाचे अध्यक्ष प्रा.डॉ.मच्छिंद्र सकटे, रिपब्लिकन नेते हनुमंत साठे, माजी आमदार राजीव आवळे, माजी आमदार राम गुंडिले, मानवी हकक् अभियानचे अध्यक्ष प्रा.मिलिंद आव्हाड, शिवसेना नेते बाळासाहेब भांडे, राष्ट्रवादी चे नेते नगरसेवक सुभाष जगताप,

लहुजी समता परिषदेचे अध्यक्ष मा.अनिलजी हतागळे, रिपब्लिकन नेते प्रा.सुकुमार कांबळे, राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाचे अध्यक्ष विजय डाकले, मनोज कांबळे, NSUI चे नेते नगरसेवक अविनाश बागवे यासह महाराष्ट्रातील 30 विविध पक्ष संघटनाचे प्रमुख पदाधिकारी या बैठकीत उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *