तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात ग्रो अँन्ड ग्लो शाळेच्या कु. सलवा आफशीन मोहम्मद शफी आणि कु. श्री (डॉली) संजय बनसोडे ठरल्या अव्वल.


तालुक्‍यात प्रथम क्रमांक पटकावून जिल्हास्तरीय प्रदर्शनासाठी पात्र

कंधार :- नुकत्याच झालेल्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात ग्रो अँन्ड ग्लो शाळेने घवघवीत यश संपादन केले आहे.येत्या काळात होणाऱ्या राज्य स्तरीय विज्ञान प्रदर्शनानिमीत्त तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे गणपतराव मोरे विद्यालय कंधार येथे शिक्षण विभागाकडून आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेसाठी शाळेचे शिक्षक कु. सय्यद आफ्रिन फातेमा व श्री संदीप ढवळे यांनी मुलांना मार्गदर्शन केले.

यामध्ये कंधार येथील ग्रो अँन्ड ग्लो शाळेच्या कु. सलवा आफशीन मोहम्मद शफी आणि कु. श्री संजय बनसोडे या विद्यार्थ्यांची प्रथम क्रमांक मिळवुन जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी निवड झाली आहे. या स्पर्धेसाठी

आपल्या विविध नाविन्यपूर्ण उपक्रमासाठी ही शाळा नेहमी ओळखली जाते या यशाने प्रशालेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला याबद्दल पालक वर्गात समाधान पहायला मिळत आहे.

याबद्दल गटशिक्षणाधिकारी श्री येरमे सर,B. E. O. ऑफिस चि संपूर्ण टीम, संस्थाचालक शंतनु कैलासे मुख्याध्यापक कल्पना चालिकवार व अर्चना अनावडे शाळेतील सर्व शिक्षक आणि पालक यांच्याकडून विद्यार्थ्यांवर अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *