फुलवळ ( धोंडीबा बोरगावे )
आज ता. २० ऑगस्ट रोजी सकाळी सकाळी अंगणवाडीतील विद्यार्थी व माता पालकांना एकत्र अंगणवाडीत बोलावून सर्वांचा उत्साह पाहून सदर दहीहंडी कार्यक्रम आयोजित करण्याचा निर्णय अंगणवाडी कार्यकरतीने घेतला.
त्यानंतर सर्व मुलं, मुलींना नटवून , खटवून त्यातीलच सत्यम नारायणराव मंगनाळे व शिवम नारायणराव मंगनाळे हे जुळे भाऊ असल्याने या दोन्ही मुलांना श्रीकृष्ण करण्यात आले तर त्यांचीच बहीण असलेल्या शिवन्या नारायणराव मंगनाळे या मुलीला राधा बनवण्यात आले. त्यानंतर त्यांचे सवंगडी म्हणून तयार असलेले विद्यार्थी , विद्यार्थिनी तमन्ना , अलिना , अनमसिद्दीका , खुशी , श्रेया , नसरीन , अदनान , आरमान , रियाज , आर्यन , तबसुम , जिया आदी विद्यार्थ्यांना सोबत घेऊन हा दहीहंडी चा कार्यक्रम पार पाडण्यात आला.
यावेळी माता पालक अश्विनी नारायणराव मंगनाळे , शिवकांता व्यंकटी मंगनाळे , शकुंतला देविदास पटणे , रुखियाबी रब्बानी शेख , रहीसा यासिन शेख यांची प्रमुख उपस्थिती होती. आपल्या अंगणवाडी कार्यकर्ती चा उत्साह पाहून व आपापल्या मुलांचा आनंद द्विगुणित करण्यासाठी या माता पालकांनी वेळातलावेळ काढून हा संपूर्ण कार्यक्रम यशस्वी केला. विशेषतः मुलांची सजावट व दहीहंडीची तयारी करण्यासाठी येथीलच जि.प.शाळेतील सह शिक्षक नामदेव कपाळे यांनी मोलाचे सहकार्य केले.
सदर कार्यक्रम आयोजना पासून ते संपन्न होईपर्यंत मुलांचा उत्साह पाहून आपणही भारावून गेल्याची प्रतिक्रिया अंगणवाडी कार्यकर्ती वंदना मंगनाळे / होणराव यांनी दिली. तसेच यासाठी सहकार्य करणारे कपाळे सर व सर्व मातापालक यांनीही घेतलेल्या मेहनी बद्दल व केलेल्या सकार्याबद्दल उपस्थित सर्वांचे अंगणवाडी कार्यकर्तीने आभार व्यक्त केले.