श्रावण मासनिमित्त फुलवळ येथील महादेव देवस्थानची महती

फुलवळ ( धोंडीबा बोरगावे )

कंधार तालुक्यातील मन्याड खो-याच्या शेजारी असलेल्या फुलवळ येथील महादेव मंदिरात दर्शनासाठी शिवभक्तांची मांदियाळी श्रावण सोमवार बरोबरच दररोजच दिसत आहे. त्यानिमित्ताने या महादेव देवस्थान ची सर्वदुर असलेल्या प्रचितीची थोडक्यात महती अशी…

  हे देवस्थान भक्तांच्या नवसाला पावणारे असल्याचे अनेकांनी बोलून दाखवले. तर मुळात याचा नावलौकिक असा की , एकेकाळी फुलवळ येथील एका शेतकरी कुटुंबातील मुलीची अपार श्रद्धा या महादेवावर असल्याने ती दररोज ,  वर्षाचे बारा महिने , ३६५ दिवस न चुकता रात्रीच्या वेळी पंचारती घेऊन या मंदिरात जात असत व आरती करुन देवदर्शन घेऊन घरी परत येत असे. अशी माहिती कांही जुन्या जानत्या व्यक्तिकडून समजतेय.

कालांतराने त्या मुलीचे लग्न झाले , ती सासरी गेली. पण तीची महादेवावरची अपार श्रद्धा कांही कमी झालीच नाही. म्हणुनच की काय ती कांही दिवसांनी पुन्हा फुलवळ च्या महादेवाकडे दर्शनासाठी जाण्याचा निर्णय घेऊन आपल्या सासर गावाहुन दररोज संध्याकाळी फुलवळ येथील महादेवाला पंचआरती घेऊन येत असे. पुजा करुन रात्रीच ती आपापल्या सासर ला परत जात असे.

हा तीचा कार्यक्रम नित्यनेमाणे सुरुच होता. आपली धर्मपत्नी दररोजच रात्रीच्या वेळी नेमके कुठे जातेय याबद्दल तीच्या पतीच्या मनात शंका , कुशंका काहूर निर्माण होऊ लागले.

एके दिवशी असेच ती रात्रीच्या वेळी महादेवाचे दर्शन घेण्यासाठी निघाली तेंव्हा तिच्या नव-याने तीचा पाठलाग करण्याचे ठरवले. नित्यनेमाप्रमाणे त्या दिवशी ती पंचआरती घेऊन फुलवळ च्या महादेव मंदिराकडे दर्शनासाठी निघाली. तीच्या नव-याने याची खबर ठेऊन कांही अंतराने तिच्या पाठीमागे पाठलाग करत निघाला. याची परंतु याची तिला कसलीच कल्पना नव्हती .

ती महादेव मंदिरात आली पुजा , आरती केली केली आणी परत सासर च्या वाटेने निघणार एवढ्यातच तिच्या कानी एक आवाज पडला की, तुझा नवरा तुझा पाठलाग करत आहे. तेंव्हा तु आलेल्या मार्गाने न जाता दुसऱ्या मार्गाने जा. असा आवाज कानी पडताच ती आश्चर्यचकित झाली. तीने मागे वळून पाहिले पण कोणीच दिसेना , तो आवाज मंदिरातुनच महादेवाचा असल्याची खात्री तीला झाली.

  त्यावरून ती त्या आवाजातुन सांगितल्याप्रमाणे त्याच घागरद-याच्या घनदाट जंगलातुन मार्ग काढत जात असताना घागरद-याच्या जंगलात तीला एका वाघाची डरकाळी कानी पडली. वेळ  रात्रीची काळोख अंधार. मागे वळून पाहताक्षणी तीला महादेवाचे दर्शन झाले. आणि तात्काळ महादेव गुप्त झाले.      महादेव कोण्या कड्याकपा-यात लुप्त झाले हे तिला समजलेच नाही. पण माझा महादेव याच कड्या कपारीत आहे असे तीचे मन तीला ग्वाही देऊ लागले. आणि तसेच घडले. तेंव्हापासूनच घागरदरा येथील महादेवाला कड्याचा महादेव असे संबोधले जाते आणी तसेच अस्तित्वात आल्याचे बोलले जाते असेही जाणकार मंडळींकडून ऐकायला मिळते.

  दरवर्षी आमली बारस निमित्त फुलवळ येथे महादेवाची खुप मोठ्याप्रमाणात यात्रा भरते. फुलवळ सह पंचक्रोशीतील भाविक या यात्रेत सहभागी होतात हे देवस्थान नवसाला पावणारे असल्याचे भाविक बोलुन दाखवतात तर श्रावण महिण्यात महाराष्ट्रासह कर्नाटक , आंध्रप्रदेश या भागातुन भाविक येथे दर्शनासाठी येत असतात. सध्या भाविकांची मांदियाळीच पहायला मिळत आहे.

सध्या याच फुलवळ येथील श्री क्षेत्र महादेव मंदिर परिसरात विकासात्मक कामे चालू असून काही दिवसांपूर्वी च मुख्य राष्ट्रीय महामार्ग ते मंदिर पर्यंत सीसी रस्त्याचे काम पूर्ण झाले असून आता याच मंदिर परिसरात व रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी विविध प्रकारचे वृक्षारोपण ची कामे चालू असून लवकरच या सर्व झाडांना संरक्षण म्हणून लोखंडी जाळ्या पण बसवण्यात येणार आहेत. याकामी अनेक भक्त व दानशूर जमेल तशी देणगी पण देत आहेत.

खंत मात्र एवढीच की हे एवढे जुने , प्रसिद्ध व नवसाला पावणारे देवस्थान असून फुलवळ सह परिसरातील सर्व भक्तांचे श्रद्धास्थान असतानाही आजपर्यंत येथे तिर्थक्षेत्राचा दर्जा मिळाला नसून अनेक नेत्यांनी आश्वासने दिली पण त्याची पूर्तता आद्यपतरी झाली नसल्याने येणाऱ्या काळात तरी लोकप्रतिनिधी नी याकडे लक्ष घालावे व तीर्थक्षेत्र म्हणून दर्जा मुळवून द्यावा अशी माफक अपेक्षा फुलवळकरांबरोबरच शिवभक्तांना लागली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *