कंधार ; दिगांबर वाघमारे
गटसाधन केंद्र पंचायत समिती कंधार तर्फे गणपतराव मोरे विद्यालय येथे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन आज दिनांक 20 ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आले होते . त्यामध्ये विद्यार्थ्यांनी वेगवेगळे उपयुक्त प्रयोग सादर करून प्रतिसाद नोंदवला .
या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन कार्यक्रमाचे अध्यक्ष गट शिक्षणाधिकारी संजय येरमे तर उद्घाटक म्हणून ज्येष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी राजेश्वर पांडे आणि प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षण विस्तार अधिकारी वसंत मेटकर यांची उपस्थिती होती .
श्री गणपतराव मोरे विद्यालयाचे मुख्याध्यापक गोविंद कौशल यांनी या कार्यक्रमाचे प्रस्तावना करून उपस्थित विज्ञान प्रदर्शनात सर्व मान्यवरांचे स्वागत केले
यावेळी गटशिक्षणाधिकारी संजय यरमे यांनी मार्गदर्शन करताना आजच्या विद्यार्थी हा सक्षम झाला पाहीजे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनातून देशाला वैज्ञानिक मिळतील ग्रामीण भागात विज्ञान प्रदर्शनाची आवश्यकता असून त्यामुळे विद्यार्थ्यांचा वैज्ञानिक दृष्टिकोन वाढतो असेही प्रतिपादन त्यांनी यावेळी केले .
सदरील तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनास पर्यावरण अनुकूल , आरोग्य आणि स्वच्छता , सॉफ्टवेअर आणि ॲप्स , वाहतूक परिवहन , पर्यावरण आणि हवामान बदल , ग्रामीण मॉडेल या विषयावर तालुक्यातील वर्ग सहा ते आठवी आणि मोठा गट आठवी ते दहावी या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदला होता .
तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी परीक्षक म्हणून रमेश राठोड ,बळवंत मंगनाळे , गणपतराव गुट्टे , परशुराम कारभारी , विजय जोशी , परमेश्वर साळुंखे यांनी काम पाहिले.
विज्ञान प्रदर्शनाच्या यशस्वीतेसाठी यावेळी सिद्धेश्वर मलगिरवार विशेष शिक्षण तज्ञ , प्रद्युमसिंग काळे ,ओमप्रकाश येरमे , प्रशांत नरहरी , आनंद तपासे , ज्ञानेश्वर चाटे , शुद्धोधन गवळे , ज्योती स्वामी , शिवकुमार कनोजवर , शिवाजीराव डिकळे , दिगंबर वाघमारे आणि केंद्रप्रमुख निवृत्ती वाघमारे , माधव कांबळे , उद्धव सूर्यवंशी , मेहरबान पवार , मोहम्मद इमरोज , बालाजी रविराज यांना घेतले .
यावेळी पालक व विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती .