कंधार ; दिगांबर वाघमारे
दिनांक १८ ऑगस्ट २०२२ रोजी वेळ सकाळी १०:०० वा. संपन्न होणाऱ्या भव्य मोफत सर्व रोग निदान शिबीर व बुस्टर डोस
कोरोना प्रतिबंधक लस
ग्रामिण रुग्णालयाचे वैद्यकिय अधिकारी डॉ. सुर्यकांत लोणीकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपलब्ध करून देण्यात आली आहे.
शिबीरात हृदयरोग तज्ञ डॉ. व्यंकटेश दुबे ,आस्थिरोग तज्ञ डॉ. प्रमोद चिखलीकर ,
स्त्रीरोग तज्ञ डॉ. स्वप्नील रनदिवे ,बालरोग तज्ञ डॉ. गजानन आंबेकर ,स्त्रीरोग तज्ञ डॉ. सौ. वसुधा आंबेकर ,जनरल फिजिशियन डॉ. रामराव सदावर्ते ,
तसेच डॉ. श्रीकांत मोरे वैद्यकिय अधिकारी ,डॉ. कौलास फाजगे ,डॉ. लक्ष्मीकांत पेठकर , डॉ. राजेश्वर पांचाळ ,डॉ. यशवंत तेलंग ,डॉ. रामराव फुलवळे
जनरल फिजिशियन
,डॉ. विवेक कल्याणकस्तुरे
जनरल फिजिशियन ,
डॉ. सौ. धनश्री पेठकर त्वचा,मुळव्याध,वातरोग तज्ञ ,
डॉ. फातेमा शेख
जनरल फिजिशियन ग्रा.रु. कंधार ,डॉ. माधव कुद्रे जनरल फिजिशीयन ,डॉ. तिरुपती खाडे नेत्ररोग तज्ञ ,बालरोग तज्ञ
डॉ. नरेश उमरजकर ,डॉ.भगवान जाधव बालरोग तज्ञ ,
डॉ. प्रकाश सादलापुरे
जनरल फिजिशियन, आदी डॉक्टरा मार्फत मोफत रोग निदान शिबीर संपन्न होणार आहे .
सदरील कार्यक्रमाचे आयोजन श्री संत महंत एकनाथ गुरु नामदेव महाराज मठाधिपती श्री संत नामदेव महाराज संस्थान श्री क्षेत्र उमरज ता. कंधार यांनी केले असून पंचक्रोशीतील हजारो भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे व सर्व कार्यक्रमाचा शिबीराचा लाभ घ्यावं तसेच
त्याच दिवशी म्हणजे १८ ऑगस्ट रोजी भव्य रक्त दान शिबीराचे आयोजन करण्यात आले असून जास्तीत जास्त भक्तांनी रक्तदान करण्यासाठी पुढे यावे असे आवाहन क
दरम्यानदरम्यान धाकटे पंढरपूर अशी ओळख असणारे श्रीक्षेत्र उमरज येथे अखंड हरिनाम सप्ताह दिनांक 12 ऑगस्ट पासून चालू असून 19 ऑगस्ट रोजी श्री गुरुवर्य संत महंत श्री एकनाथ गुरु नामदेव महाराज यांच्या कीर्तनाने व महाप्रसादाने सांगता होणार आहे .