गुलाल मुक्त गणेश उत्सव साजरा करणार पाताळगंगा गावाने घेतला ठराव

कोरोना जागतिक महामारीने थैमान घातले असल्याने दोन वर्ष धार्मिक व सार्वजनिक कार्यक्रमावर निर्बंध घालण्यात आले होते.कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असल्याने शासनाने सर्व निर्बंध उठवले आहेत त्यामुळे या वर्षीचा गणेशोत्सव हा मोठ्या धुमधडाक्यात साजरा होणार आहे. या संदर्भात नुकतीच उपजिल्हाधिकारी शरद मंडलिक यांनी शांतता कमिटीची बैठक घेऊन गुलाल मुक्त गणेश उत्सव साजरा करण्याचे आवाहन केले होते या आव्हानाला प्रतिसाद देत कंधार तालुक्यातील पातळगंगा येथील नागरिकांनी बैठक घेऊन गुलाल मुक्त व डीजे मुक्त गणेश उत्सव साजरा करणार असल्याचा ठराव घेतला असल्याची माहीती माजी सैनिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष बालाजी चुक्कलवाड यांनी दिली आहे.

 

दिनाक 25आॕगस्ट 2022रोजी रात्री 8वाजता तुकाराम महाराज मंदिरात नारायण पांडुरंग मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली. या बैठकीत माजी सैनिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष बालाजी चुक्कलवाड यांनी मार्गदर्शन केले.या अगोदर गावात जे काही राजकारण झालं ते झाल यापुढे गावात कोणतेही राजकारण होणार नसुन गावाच्या विकासाठी व आदर्श गाव म्हणून गावची ओळख होण्यासाठी सर्व जाती धर्माच्या नागरीकांनी एकत्र येणे गरजेचे आहे.त्यामुळे येणाऱ्या काळात प्रत्येक सन सर्व एकत्र मिळुन करायचे आहे.काही दिवसावर गणेश उत्सव येत असुन गणेश उत्सवात आपल्या गावचे नाव तालुक्याच्या ठिकाणी आले पाहिजे याच हेतुने गणेश उत्सव साजरा करायचा आहे. उपविभागीय अधिकारी शरद डॉ. शरद मंडलिक यांच्या सूचनेनुसार गुलाल मुक्त गणेश उत्सव साजरा करायचा आहे त्याचबरोबर डीजे लावून धांगडधिंगा करण्यापेक्षा याच पैशातून भ्रष्टाचार मुक्त निवडणुका कशा पार पाडतील यासाठी जनजागृती करण्यासाठी विविध नाटके व सामाजिक हिताचे कार्यक्रम घेण्यात यावे असा मार्गदर्शन केल्यानंतर बालाजी चुक्कलवाड यांच्या आव्हानाला सर्वांनीच प्रतिसाद देऊन गुलाल मुक्त डिजे मुक्त गणेश उत्सव साजरा करण्याचा ठराव गावकऱ्यांनी घेतला असल्याची माहीत बालाजी चुक्कुवाड यांनी दिली आहे.या याच बैठकीत गणेश मंडळाची कार्यकारणी घोषीत करण्यात आली

यावेळी दत्ता पंढरी मुंडे, नामदेव मुंडे,ऐकनाथ मुंडे, संतोष चुकलवाड, बापुराव मुंडे, राजीव मुंडे,ओम मुंडे, तुकाराम गंगणपाड, तुकाराम मुंडे, अनिल कोंडे, धोंडीबा आरसुलवाड,व गावकरी मंडळी आदी.. उपस्थित होते…

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *