फुलवळच्या महादेव मंदिरात शासकीय गुत्तेदार वैजनाथराव सादलापुरे यांच्यातर्फे महाप्रसाद

फुलवळ ( प्रा भगवान आमलापुरे ) येथून जवळच असलेल्या मौजे फुलवळच्या पुरातन महादेव मंदिरात शेवटच्या श्रावणी सोमवार निमित्ताने सादलापुरे परिवारातर्फे महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.

  • अधिक माहिती असी की येथील जांब जळकोट रोडवर , फुलवळ कंधारेवाडी शिवेवर ,पुरातन महादेव मंदिर आहे. येथे प्रत्येक महिन्याच्या शिवरात्रीला शिवरात्र मोठ्या भक्तीभावाने साजरी करतात. यात रात्री महादेवास दुधदह्याचा अभिषेक करून पुजा केली जाते. त्यानंतर मध्यरात्रीपर्यंत भजन करण्यात येते.
    दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणजे अमावस्येला शिवरात्र सोडण्यासाठी महाप्रसादाचे आयोजन करतात. यात फुलवळ,कंधारेवाडी, महादेव तांडा आणि काही कंधारकर भक्त पुढाकार घेतात.
    दरम्यान श्रावण महिन्यातील शिवरात्रीला शासकीय गुत्तेदार वैजनाथराव सं सादलापुरे महाप्रसादाचे आयोजन करतात. परंतु या श्रावणी शिवरात्रीची अडचण अशी की दुसऱ्या दिवशी पिठोरी ,बैलपोळा असतो. त्यामुळे शेतकरी बांधव आपापल्या कामात आणि सणात व्यस्त असतात.त्यामुळे बऱ्याच वर्षांपासून असा पायंडा पडला आहे की श्रावणी अमावस्येच्या ऐवजी शेवटच्या श्रावणी सोमवार निमित्ताने महाप्रसादाचे आयोजन केले जाते. जागतिक कोरोना महामारीचा अपवाद वगळता, दर वर्षी शेवटच्या श्रावणी सोमवार निमित्ताने हा महाप्रसाद आयोजित केला जातो आहे. यंदा पण दि २२ आँगस्ट रोजी तो आयोजित केला होता. दर्शन आणि महाप्रसादाचा लाभ शेकडो भक्तांनी घेतला. या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष किसान सभेचे प्रदेश सरचिटणीस मनोहर पाटील भोसीकर यांनी पण सपत्नीक महादेवाचे दर्शन घेतले.’’

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *