फुलवळ येथे बैल पोळा सण शेतकऱ्यांकडून उत्साहात साजरा.

 

कंधार ; तालुक्यातील फुलवळ येथे बैल पोळ्याचा सण शेतकऱ्यांनी उत्साहात साजरा केला. वाजत गाजत आपल्य या मिरवणुकीमध्ये भगवे फेटे बांधुन वृध्द शेतकऱ्यासह तरुण शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

 

हानुमान मंदिराच्या आवारात पारंपारिक पध्दतीने तोरन बांधून तोडण्याची पध्दत आहे .या तोरन साठी गावातील काही मानकरी आहेत त्या मानकरीच्या साह्याने तो तोरन तोडतात ती आज ही पध्दत चालु आहे. या मध्ये दोन मानकरी आहेत पहिले मानकरी ,ग्यानोबा मंगनाळे,दुसरे मानकरी तुकाराम फुलवळे असे दोन मानकरी आहेत .

वर्षभर शेतात शेतकऱ्यांची मदत करण्यासाठी अपार कष्ट करण्याऱ्या शेतकऱ्यांचा सच्चा मिञ बैल यांना बैलपोळ्याच्या दिवशी गळ्यांत चंगाळी शिंगाना कलर अंगावर कलरने विविध प्रकारची सजावट अंगावर झुली या पध्दतीने पोळ्यानिमित्त सजवुन बैलांची गावातून मिरवणूक काढत हनुमान मंदिराच्या भोवताली फेर्या मारतात.
शेतकर्याच्या घरात पुरण पोळीचा स्वयपाक करुन बैलाची पुजा करुन बैलाना पुरणपोळी खाऊ घालण्यात आली. वर्षभर शेतातील विविध कामात शेतकऱ्यांना मदत करणाऱ्या बैलाची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा बैलपोळ्याचा सण साजरा करण्यात येतो. यावर्षी मागील काही आठवड्यांपासुन पावसाने उघडीप दिली आहे. त्यामुळे खरीप हंगामातील असलेले प्रमुख पिक सोयाबीनच्या उत्पन्नात मोठी घट होऊन शेतकरी आर्थिक संकटात सापडणार आहेत. माञ तरीही बैलांची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मोठ्या उत्साहात शेतकऱ्यांनी हा सण साजरा केला आहे.

  • बैलपोळ्या निमित्त या भागात शेतकरी दिवसभर उपाशी राहुन बैलाचा उपहास करतात बैलांना सायंकाळी पुरणपोळीचे जेवण दिल्यानतंरच शेतकरी जेवण करतात. बैल पोळ्यानिमित्त शेतकऱ्यांनी बैलाची सजावट करुन घरी पूरण पोळीचा स्वयपाक करुन सायंकाळी पाच वाजणेच्या सुमारास बैलाची व इतर पशुधनाची विधीवत पुजा करुन बैलाना व इतर पशुधनाला पुरणपोळीचे जेवण दिल्यानतंर शेतकऱ्यांनी जेवण करुण उपवास सोडला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *