फुलवळ ग्राम पंचायत चा नाकर्तेपणा ग्रामस्थांच्या मुळावर.

 

फुलवळ ; विशेष प्रतिनिधी

 

कंधार तालुक्यातील फुलवळ हे जि. प. गटाचे गाव असून अकरा सदस्यीय ग्राम पंचायत असलेल्या या फुलवळ ची जवळपास सहा ते साडेसहा हजार लोकसंख्या आहे . विशेष बाब म्हणजे फुलवळ हे राष्ट्रीय महामार्गावर आले असल्याने गावाच्या हितासंदर्भात काही महत्त्वाचे निर्णय घेत असतांनाच असे येथीलच नागरिक पत्रकार धोंडीबा बोरगावे यांनी लेखी निवेदन देऊन जुने गावठाण चा नव्याने न.नं. आठ तयार करून तसे ते भोगवट्यात नोंद करावी व गावात आठवडी बाजार भरवण्याची व्यवस्था करावी अशी रीतसर मागणी केली होती . त्या दोन्ही मागण्या मंजूर ही झाल्या , तसा ग्राम पंचायत ने दुजोरा ही दिला . परंतु आद्यपतरी त्यावर कसलीही कार्यवाही किंवा पुढाकार घेऊन प्रत्यक्षात कामे चालू केली नसल्याने फुलवळ ग्राम पंचायत चा नाकर्तेपणा ग्रामस्थांच्या मुळावरच का ? असा सवाल निर्माण झाला आहे.

फुलवळ ग्रामपंचायत

 

फुलवळ शेजारीच १९६२ साली मानार प्रकल्पाची उभारणी झाली , त्यावेळी फुलवळ चा काही भाग पुनर्वसित म्हणून घोषित करण्यात आला होता. तेंव्हा पासून फुलवळ जुने गावठाण ला न.नं. ८ चा उतारा मिळत नव्हता. शासकीय योजना मात्र पुरेपूर राबविण्यात येत होत्या परंतु वयक्तिक लाभाच्या कामांसाठी मात्र वानवाच होत होती. याचाच आधार घेऊन पत्रकार धोंडीबा बोरगावे यांनी ता. २२ नोव्हेंबर २०१७ रोजी फुलवळ ग्राम पंचायत चे तत्कालीन ग्रामविकास अधिकारी यांच्याकडे रीतसर लेखी निवेदन देऊन जुने गावठाण चा भोगवट्यात समावेश करून नव्याने फेराकारणी करावी व न.नं. आठ तयार करावा अशी मागणी केली होती.

त्यावरून सदर ग्राम पंचायत ने प्रशासकीय स्तरावर वेळोवेळी पाठपुरावा केला , त्या पाठपुराव्याला अखेर यश आले आणि जानेवारी २०२२ मध्ये तशी शासकीय मंजुरी ही मिळाली. त्यात जुनेगावठाण चा भोगवट्यात समावेश करून नव्याने न.नं. ८ तयार करण्यास परवानगी ही देण्यात आली. तरीपण आद्यपतरी या ग्राम पंचायत कडून त्यावर कसलीच कार्यवाही करण्यात आली नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

 

याच बरोबर फुलवळ येथून राष्ट्रीय महामार्ग जात असल्याने आणि फुलवळ ला अनेक खेडे गाव संलग्न असल्याने फुलवळ येथे आठवडी बाजार भरवण्याची ग्राम पंचायत ने व्यवस्था करावी अशा मागणीचे निवेदन ही पत्रकार धोंडीबा बोरगावे यांनी ता.२० जानेवारी २०२२ रोजी ग्राम पंचायत ला दिले आहे. त्यासंदर्भात ग्राम पंचायत ने कृषी उत्पन्न बाजार समिती कंधार यांच्याकडे पाठपुरावा करून परवानगी मागितली होती. त्यावर कंधार कृषी उत्पन्न बाजार समिती ने मार्च २०२२ मध्ये तसे पत्र देऊन आठवडी बाजार भरवण्याची परवानगी ही दिली.परंतु या ग्राम पंचायत त्यावर ही आद्यपतरी कसलेच पाऊल उचललेले दिसत नाही.

 

जर का वरील दोन्ही कामांप्रति ग्राम पंचायत ने कार्यतत्पर दाखवत वेळीच कार्यवाही केली तर जुनेगावठाण मधील लाभार्थ्यांना वयक्तिक लाभांच्या योजना हक्काने घेता येतील , तसेच आठवडी बाजार लवकरच सुरू झाला तर येथील व्यावसायिक , व्यापारी , ग्राहक व ग्रामस्थांना याचा चांगलाच लाभ होईल व फुलवळ ची आणखी वेगळी ओळख निर्माण होईल. त्यासाठी ग्राम पंचायत ने तात्काळ ही दोन्ही कामे लवकरात लवकर हाती घेऊन कार्यान्वित करावीत अशी जणमाणसातून मागणी होत आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *