कंधार ; प्रतिनिधी
जगभरातील कोरोनाकाळानंतर देशात आणि राज्यात कोरोनाचे निर्बंध उठवल्यामुळे सामान्यमाणसाला पुनः एकदा वैक्तिक स्वातंत्र्य मिळाल्यासारखे झाले आहे.आज देशाला ७५ वर्ष पूर्ण झाल्याने देशभर स्वातंत्र्याचा अमृत मोहत्सव साजरा करत असताना कंधार येथील २० व्या दही हंडी उदघाटन महिलांच्या हस्ते होणे हे आजच्या महिलांसाठी गौरवास्पद आणि प्रेरणादाई आहे असे प्रतिपादन दही हंडी कार्यक्रमाच्या उदघाटन प्रसंगी कंधार येथे भाजपाच्या प्रदेश महिला उपाध्यक्ष प्रणीताताई देवरे-चिखलीकर यांनी कंधार येथे व्यक्त केले.
विश्व हिंदू परिषद वर्धापन दिनानिमित्त आयोजित दहीहंडी महोत्सवास प्रथमच विविध क्षेत्रांमध्ये नावलौकिक करणाऱ्या महिलांना प्रमुख पाहुणे म्हणून बोलवण्यात आले ,या सोहळ्यास कंधार नगरीच्या प्रथम नागरिक शोभाताई नळगे,दहीहंडी स्पर्धेचे उदघाटक प्रणिता ताई देवरे चिखलीकर,प्रा चित्रताई लुंगारे,माजी जिल्हा परिषद सदस्या वर्षाताई भोसीकर,नगरसेविका वर्षाताई कुंटेवार, भाजप महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष चित्रताई गोरे,भाजपचे तालुकाध्यक्षा डॉ जयमंगला औरादकर,वंदनाताई ढुमणे,सुनंदा वंजे,कल्पना गीते, डॉ अर्चना जाधव,डॉ दिपाली तायडे, डॉ तक्षशिला पवार,डॉ सुचिता फाजगे ,यांच्यासह कंधार तालुक्यातील विविध क्षेत्रांमध्ये आपले नाव लौकिक करणाऱ्या माता भगिनी उपस्थित होत्या.यावेळी या महिलांचा सत्कार व सन्मान संयोजन समितीच्या वतीने करण्यात आला.
कंधार येथील प्रसिद्ध व्यापारी तथा हरित कंधार चे शिवा मामडे आणि भाजपचे शहराध्यक्ष अड गंगाप्रसाद गोविंदराव यन्नावार यांच्या संकल्पनेतून गेल्या २० वर्षांपासून विश्व हिंदू परिषद वर्धापन दिन व गोकुळाष्टमीनिमित्त दहीहंडी उत्सव अविरतपणे चालू असलेला हा गोविंदा गोपाळाकला दही हंडीचा उत्सव दि २५ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वा छत्रपती शिवाजी महाराज चौकात मोठ्या उत्साहात साजरा केला गेला.
डि,जे च्या तालावर संगीतमय रोषणाईत बालगोविंदपासून शहरातील जेष्टानी विविध आधुनिक हिंदी मराठी गीतावर ठेका धरून गोविंदाने मनमुराद आनंद लुटला आणि उतुंग अशा दही हंडीचा मनोरा प्रकार विविध ठिकाणाहून आलेल्या गोविंदा पथकांनी आपला देखावा कंधारकरांना दाखून या कार्यक्रमाचे लक्ष वेधून घेतले.
नांदेड येथील चिकलवाडीच्या बजरंग गोविंद पथकाने दही हंडीचे प्रथम पारितोषिक आणि कृष्ण लीला असलेला पूर्णाकृती असलेला सन्मानचिन्ह असलेला पटकावून कंधारकराणचे मने जिंकले.या स्पर्धेत सीता नगर गोविंदा पथक कंधार व संस्कृती दहीहंडी मंडळ पथक भुई गल्ली नांदेड यांनी सहभाग नोंदवला सहभागी संघास प्रोत्साहनपर बक्षीस देण्यात आले या दहीहंडी महोत्सवाच्या यशस्वीतेसाठी प्रायोजक शिवा मामडे,आयोजक अड गंगाप्रसाद यन्नावार ,योगेंद्रसिंह ठाकूर, अजय मोरे, शुभम संगणवार ,प्रवीण बनसोडे, तारकेश तपासे, शेखर वडजकर ,निलेश गौर, रमेश पवार,रामदास बाबळे, सुमित गोरे, निशांत बनसोडे ,अभिजीत इंदुरकर, शैलेश बयास, उमेश भुरेवार, पंडित ढगे ,विशाल बासटवार ,किशन कळणे, कृष्णा बनसोडे ,सुरेश कल्याणकर ,नाना चिवळे, राजरत्न सूर्यवंशी, अड रवी केंद्रे,भूषण पेटकर,रोहित पवार,स्वप्निल सलमोटे,रवी संगेवार,विठल मुंगीलवार ,अतुल वडजे,राजु मठपती ,अमित सलमोटे,बालाजी कळणे,सचिन कोंडे,शिवा प्रेमलवाड यांनी प्रयत्न केला.