कंधार तालुक्यातील फुलवळ येथील भूमिपुत्र असलेले व मुदखेड येथील महात्मा गांधी ज्युनिअर काॅलेजचे प्रा.डि.एस. मंगनाळे यांची मुदखेड तालुका जुक्टा संघटनेच्या अध्यक्षपदी निवड झाल्या बद्दल सर्व स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असतांनाच प्रा.डि.एस मंगनाळे यांचा फुलवळ येथे सत्कार करून भावी कार्यास त्यांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी ग्रा.प.सदस्य चंदबस मंगनाळे, प्रविण मंगनाळे, श्रीकांत मंगनाळे, इंजि भगवान शेंबाळे, बि.एन.लाटकर, प्राचार्य जि.एस. फुलवळे, गोविंद कंधारे, शरद बोरगावे, मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष बसवंते व्हि.जी, उपाध्यक्ष शादुल शेख,मधुकर डांगे, धोंडीबा बोरगावे , दिगंबर डांगे, प्रमेश्वर डांगे, कामाजी मंगनाळे, संजय फुलवळे यांची उपस्थीती होती.