कंधार येथिल महात्मा फुले प्राथमिक शाळेत शिक्षक दिन साजरा

 

कंधार ;

कंधार येथिल महात्मा फुले प्राथमिक शाळेत ५ सप्टेंबर डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्म दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यात आला .

 

या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मुख्याध्यापक वाघमारे डी जी यांची प्रमुख उपस्थिती होती , तर कार्यक्रमाचे सत्कारमूर्ती शिक्षिका सौ उषा कागणे , शिक्षक आनंदा आगलावे , राज केंद्रे यांची उपस्थिती होती . शाळेतील विद्यार्थ्यांच्या वतीने शिक्षकांचा सत्कार करण्यात आला सदरील कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विद्यार्थ्यांनी नियोजन केले होते . इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांनी डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जीवन चरित्रावर भाषण केले . उत्कृष्ट भाषण करणाऱ्या विद्यार्थ्यांना शाळेच्या वतीने शैक्षणिक साहित्याचे वाटप हिंदवीबाणाचे संपादक माधव भालेराव व उपसंपादिका अर्चना भालेराव यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार बालकताई चंद्रकला तेलंग यांनी मानले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *