शिक्षक दिनी गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती कंधार तर्फे शिक्षकांचा गौरव!

  1. कंधार ; प्रतिनिधी

‘ 5 सप्टेंबर ‘ म्हटल की शिक्षकांचा गौरव अर्थात भारताचे दुसरे राष्ट्रपती ‘ डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन ‘ यांचा जन्मदिवस. 5 सप्टेंबर हा 1962 पासून देशात ‘ शिक्षक दिन ‘ म्हणून साजरा केला जातो.
काल दि. 5 सप्टेंबर रोजी गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती कंधार व संस्था तर्फे विद्या विकास प्राथमिक शाळा कंधार व प्रबोधनकार ठाकरे प्राथमिक शाळा कंधार येथे श्री संजय येरमे साहेब गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती कंधार व केंद्र प्रमुख श्री माधव कांबळे सर यांच्या वतीने सर्व शिक्षकांचा गौरव करण्यात आला.

शिक्षक दिनी आमच्या शाळेतील कर्मचारी कुटूंबातील आम्हा सर्व सदस्यांचा आम्ही करत असलेल्या कार्याचा म्हणजे कर्तृत्वाचा गौरव त्यांनी केला. त्यानंतर आम्ही आमच्या कुटुंबातर्फे आभार म्हणून श्री संजय येरमे साहेब गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती कंधार व केंद्रप्रमुख श्री माधव कांबळे सर यांचा पुस्तक भेट देऊन सत्कार केला.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *