नांदेड : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या कार्य आणि कर्तृत्वाचा गौरव करत रशिया येथील मास्को शहरातील जगप्रसिद्ध लायब्ररी रोडोमिनो मार्गारिटा फोरेन लांग्वेज स्टडी फॉर फोरेन लिटरेचर येथील प्रांगणात आज १४ सप्टेंबर रोजी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अनावरण संपन्न झाले आहे.
त्यासोबतच रशियातील भारतीय दूतावासात सायंकाळी साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांच्या तैलचित्राचे अनावरणही भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेचे अध्यक्ष डॉ. विनय सहस्त्रबुद्धे यांच्या शुभहस्ते झाले आहे. या समारंभास केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री स्वामीजी, विधानसभेचे सभापती ऍडव्होकेट राहुल नार्वेकर, मुंबई विद्यापीठातील रशियन भाषा विभागाचे प्रमुख व युरोशियन अभ्यास केंद्राचे संचालक प्रा. डॉ. संजय देशपांडे,मातंग ग्रुप डेव्हलपमेंटचे सुनील जी वारे, मुंबई विद्यापीठातील साहित्यरत्न लोकशाहीर आण्णा भाऊ साठे अध्यासन केंद्राचे प्रमुख प्राचार्य डॉ. बळीराम बळीराम गायकवाड आद़ींची प्रमुख उपस्थिती होती.
रशिया सारख्या प्रगतशील देशात साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्याचा सन्मान झाला असून महाराष्ट्र शासनाने याची दखल घेत मुंबई विद्यापीठाला साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांचे नाव देऊन त्यांचा गौरव करण्याचे आवाहन महाराष्ट्र शासनाच्या साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे चरित्र साधने प्रकाशन समितीचे माजी सदस्य शिवा कांबळे यांनी केले.पुतळा अनावरण समारंभ आणि तैलचित्राच्या प्रकाशनानिमित्त नांदेड शहरातील साहित्यरत्न लोकशाहीर आण्णा भाऊ साठे यांच्या पुतळ्यासमोर आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
यावेळी प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव अॉड सुरेंद्र घोडजकर,राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस गणेश तादलापूरकर,अण्णा भाऊ साठे पुतळा समितीचे अध्यक्ष भारत खडसे, युवक काँग्रेस जिल्हा सरचिटणीस संजय गोटमुखे,भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष गणेश मोरे,दलित मित्र रामराव सुर्यवंशी, उद्योजक, संस्थाचालक आणि दलित महासंघाचे लालबाजी घाटे,सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता सुग्रीव अंधारे, डी.एन शेळके,एन.जी.पोतरे, विठ्ठलराव आंबटवार,सेवानिवृत्त सहाय्यक पोलिस निरीक्षक एन.डी. रोडे,माधव गोरखवाड,बालाजी जामकर,संघरत्न कांबळे,निवृत्ती सूर्यवंशी,काशिनाथ कांबळे,हिरामण गोरेवाड,सी.पी.बोईवार, विठ्ठलराव गायकवाड आदींनी या आनंदोत्सव कार्यक्रमात सहभाग घेतला.
आज देगलूर शहरातील साहित्यरत्न लोकशाहीर आण्णा भाऊ साठे यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास आणि देगलूर तालुक्यातील मरखेल तेथील पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी डी.एन.शेळके,एन.जी.पोतरे,राजीव संभाजीराव मंडगीकर आणि मी शिवा कांबळे उपस्थित होतो.