फेरोज मणियार यांना इंटरनॅशनल पुरस्कार जाहीर

लोहा (प्रतिनिधी)- लोहा येथील मत युट्यूब चॅनल व वर्तमान पत्राचे संपादक तरुण हुनहुनरी निर्भिड पत्रकार म्हणून ओळखले जाणारे फेरोज मणियार यांना इंटरनॅशनल अच्युमेंट पुरस्कार जाहीर झाला आहे.

राजस्थान येथील सुप्रसिद्ध फिल्म प्रोडक्शन अंबालिका शास्त्री यांचे शक्ती फिल्म प्रोडक्शन च्या वतीने दिला जाणारा इंटरनॅशनल अच्युवमेंट अवॉर्ड २०२२ जयपुर चा बहुमान पुरस्कार लोहा शहरांचे भूमिपुत्र दैनिक जनतेचे मत माझे मत चे संपादक व नांदेड जिल्ह्यातील संचालक फेरोज मणियार

 

जनतेचे यांना हा बहुमान राजस्थान जयपुर येथे दिनांक ३० सप्टेंबर रोजी बॉलीवूडचे सुप्रसिद्ध अभिनेत्री अभिनेत्यांच्या हस्ते दिला जाणार असुन सदरील पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल त्यांचे लोहा न पा. चे लोकनियुक्त नगराध्यक्ष गजानन सुर्यवंशी, जेष्ठ नगरसेवक बबनराव निर्मले, आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते गंगाधर महाबळे, नगरसेवक बालाजी खिल्लारे, पत्रकार विलास सावळे, विनोद महाबळे, संजय कहाळेकर, गणपत जामगे, शिवराज पाटील पवार, गोविंद पाटील पवार आदीं मित्र परिवारांने अभिनंदन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *