आनंदराव किडे यांची ग्रामीण ज्येष्ठ नागरीक सेल कंधार तालुका अध्यक्षपदी निवड

कंधार ; प्रतिनिधी

कंधार येथिल राष्ट्रवादीचे ज्येष्ठ कार्यकर्ते आनंदराव किडे यांच्या  पक्ष बांधणी कार्याची दखल घेऊन  राष्ट्रवादी काँग्रेसच्या आढावा बैठकीत नांदेड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या ज्येष्ठ नागरीक सेल ग्रामीण कंधार तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे . सदरील निवडीचे पत्र आनंदराव किडे यांना देण्यात आले .

गेल्या अनेक वर्षापासून आनंदराव किडे यांनी शैक्षणिक व  सामाजिक कार्याबरोबरच राजकीय कार्यात मोठे योगदान दिले आहे . राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून त्यांनी आतापर्यंत अनेकांच्या प्रश्नांची सोडवणूक केली आहे  . त्यांच्या या कार्याची दखल घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने ज्येष्ठ नागरीक सेल  ग्रामीण कंधार तालुका अध्यक्षपदी  निवड करण्यात आली आहे .

या निवडीचे पत्र जिल्हाध्यक्ष हरिहर भोसीकर व शेतकरी नेते माजी आमदार शंकर अण्णा धोंडगे यांच्या हस्ते कंधार येथे प्रदान करण्यात आले आहे .

या निवडी बदल यावेळी आनंदराव किडे यांनी राष्ट्रवादी पक्षाने मला दिलेली जबाबदारी मी समर्थपणे पेलण्यासाठी तयार असून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे विचार  जिल्हातील ग्रामीण भागातील नागरिकां पर्यंत पोहोचवून पक्ष बळकट करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे यावेळी मनोगत त्यांनी व्यक्त केले .

  त्यांच्या या निवडीबद्दल आनंदराव किडे यांचे सर्वच स्तरातून अभिनंदन होत आहे .

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *