कंधार ; आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जागा वाढण्यासाठी नियोजन केले जात असून सर्वच कार्यकर्त्यांनी गटातटाचे राजकारण व मतभेद विसरून केवळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विचारधारा ग्रामीण भागात रुजवून पक्ष संघटन मजबूत करावे,तसेच एक दिलाने काम करून गावागावात सभासद नोंदणी अभियान राबवावे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष हरिहरराव भोसीकर यांनी कंधार येथील आढावा बैठकीत केले .
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने कंधार येथे दिनांक १९ सप्टेंबर रोजी आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते . यावेळी शेतकरी नेते तथा माजी आमदार शंकर अण्णा धोंडगे,माजी जिल्हाध्यक्ष दत्ता पवार,जिल्हा सरचिटणीस डी.बी जांभरुनकर , महिला जिल्हाध्यक्षा अंजलीताई रावणगावकर ,ओबीसी प्रदेश सचिव अॅड अंगत केंद्रे , युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष संभाजी मुकनर ,संचालिका कृषी उत्पन्न बाजार समिती रेखाताई राहिरे ,युवती अध्यक्षा प्रियंकाताई कैवारे , नांदेड जिल्हा उपाअध्यक्ष सुभाषराव गायकवाड ,
राष्ट्रवादी नेते उत्तम सोनकांबळे , लोहा तालुका अध्यक्ष संजय पाटील कऱ्हाळे , किसान भारती जिल्हा सरचिटणीस मनोहर पाटील भोसीकर ,
विधानसभा कार्याध्यक्ष दत्ता कारामुंगे ,विश्वाबर भोसीकर , दिगांबर सोनवळे ,बाबुराव देवकत्ते ,कंधार तालुकाध्यक्ष शिवदास धर्मापुरीकर , विलास घोरबांड ,माधव शिर्शीकर ,अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष महमंद तन्वीरोदीन,युवक तालुकाध्यक्ष माधव कदम ,
रामअप्पा कौडगावे, मुकुंदराव चिवडे ,त्र्यंबक पाटील भोसीकर,बाबाराव थोटे , संभाजीराव कदम सरपंच कारतळा , नारायण पाटील चेअरमन , कमलाकर जायभाये, प्रविण मंगनाळे , परसराम कदम,राजकुमार केकाटे,ज्ञानोबा घुगे , परशुराम केंद्रे आदीसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना हरिहरराव भोसीकर म्हणाले की माझे व माजी आमदार शंकर अण्णा धोंडगे यांचे कोणतेही मतभेद नाहीत , शंकर अण्णा धोंडगे हे नेते असून त्यांच्या सोबत राहून व त्यांच्या विश्वासात राहुन कंधार लोहा तालुक्यातील आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकीचे नियोजन आहे तामुळे कोणतेही किंतू परंतु मनात ठेवता आढावा बैठकीत उपस्थित सर्व कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सदस्य नोंदणी मोठ्या प्रमाणात करावी असे आवाहन त्यांनी केले .
माजी आमदार शंकर अण्णा धोंडगे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा उमेदवार कोणताही असो त्यांना निवडून येण्यासाठी मी नेहमी प्रयत्न केला असून पुढेही भविष्यात राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्न राहणार असल्याचे सांगत विद्यमान आमदारांनी मतदारसंघाचे कशाप्रकारे वाटोळे केले यांचा उल्लेख अनेक किस्से सांगून या ठिकाणी केला .
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस युवा नेते तथा पानभोसी उपसरपंच शिवकुमार हरिहर भोसीकर यांनी आयोजन करून यशस्वीतेसाठी नियोजन केले . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अँड अंगद केंद्रे यांनी तर आभार माधव कदम यांनी मानले .