कंधार : तालुक्यातील वसंतराव नाईक ग्रामीण कृषी महाविद्यालय नेहरूनगर येथील कृषी च्या विद्यार्थ्यांनी ग्रामीण जागरूकता कार्यानुभव कार्यक्रम आणि कृषी औद्योगिक संलग्नता उपक्रम वर्ष 2022-23 मौजे शेकापूर येथे विविध उपक्रमांच्या माध्यमातून उत्साहात सुरू आहे.
हा कार्यक्रम कृषी महाविद्यालय नेहरूनगर येथील अध्यक्ष संजय पवार,प्राचार्य डॉ. आर. बी.पवार,कार्यक्रम समन्वयक डॉ. व्ही. एस.पवार, कृषी विस्तार विषयतज्ञ प्रा. व्ही. डी.राऊत सर, कार्यक्रम अधिकारी पी. एस. काळे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला.
या माध्यमातून शेकापूर गावात ग्राम चर्चासत्र आणि ग्रामीण मूल्यमापन (पि.आर. ए) उपक्रमाचे आयोजन केले. यामध्ये रांगोळीच्या माध्यमातून गावातील अडचणी, नैसर्गिक क्षेत्र, शेतीखाली क्षेत्र कृषी व्यवस्था, शैक्षणिक संस्था व गावाचा नकाशा यांची माहिती आकृतीच्या माध्यमातून सांगण्यात आली व तसेच गावातील लोकांना कृषीविषयक मार्गदर्शन करण्यात आले तसेच ग्रामीण जागरूकता कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत माती परीक्षण, बोर्डेक्स पेस्ट ,बीज प्रक्रिया , बियाण्यांची लेबल यासह विविध प्रात्यक्षिक दाखवण्यात आले व तसेच शेतकऱ्यांना उपयोगी येणारे ई पीक पाहणी या ॲप बद्दल माहिती सांगण्यात आली.
हा उपक्रम शितल राजू गायकवाड, देवकत्ते सोनाली, गायकवाड शितल, गंगारपू काव्या आणि घंटा शिवानी या कृषी कन्यांनी आयोजित केला. या उपक्रमासाठी सरपंच सौ. मीरा भुस्करे व उपसरपंच रामेश्वर मोरे, ग्रामसेवक औराळे बी. आर आणि जि . प . केंद्रीय शाळा शेकापूर येथील मुख्यध्यापक श्री. लुंगारे एच . के . आणि सर्व माननीय शिक्षकवर्ग ,गावातील शेतकरी महिला व प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.