नांदेड येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी घेतला कंधार तालुक्याचा आढावा – तालुका अध्यक्ष शिवदास पा. धर्मापुरीकर यांची माहिती

कंधार ; नांदेड येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आले असता आज दि .२० सप्टेंबर रोजी कार्याचा आढावा घेण्यात आला त्यावेळी कंधार तालुक्यातील कार्याचा आढावा तालुका अध्यक्ष शिवदास पाटील धर्मापुरीकर यांनी सादर केला तसेच सरस्य नोंदणी बाबत अहवाल सादर केला .

नांदेड शासकीय विश्रामगृह येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची संघटनात्मक व क्रियाशील सदस्य नोंदणी आढावा बैठक संपन्न झाली . राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांना सदस्य नोंदणीच्या आढावा  राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष शिवदास पाटील धर्मापुरीकर यांनी सादर केला असता जयंतराव पाटील यांनी समाधान व्यक्त केले अशी माहिती तालुका अध्यक्ष शिवदास पाटील धर्मापुरीकर यांनी दिली .

माजी आमदार व शेतकरी नेते शंकर अण्णा धोंडगे यांची उपस्थिती होती तसेच
प्रदेशाध्यक्ष  जयंत पाटील यांचा सत्कार जिल्हा परिषद सदस्य विजय पाटील धोंडगे व भरत पाटील चिखलीकर यांनी सदिच्छा भेट घेतली .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *