कंधार : प्रतिनिधी
उसाचे पैसे दिले नाही म्हणून सावरगाव फाटा चोळी तांडा ता.कंधार जि. नांदेड येथिल सुधाकर जाधव यांना आरोपींनी थापडा बुक्कयाने मारहाण करून पळवून नेल्याची घटणा घडली दि 20 सप्टेंबर रोजी घडली .
सावरगाव फाटा चोळी तांडा ता.कंधार जि. नांदेड येथे, यातील फिर्यादी व त्यांचे काका हे सोबत गावाकडे जात असतांना त्यांचे रस्त्यावर मोटार सायकल समोर येऊन सुधाकर जाधव यास मोटार सायकल वरून खाली उतरून उसाचे पैसे अजुन दिले नाही असे म्हणुन थापडा बुक्कयाने मारहाण करून पळवून नेले.
वगैरे, फिर्यादी बालाजी मिठु चव्हाण, वय 38 वर्षे, व्यवसाय मजुरी रा. चोळी तांडा ता. कंधार जि. नांदेड यानी दिलेल्या फिर्यादवरुन पोस्टे कंधार गुरनं 296 / 2022 कलम 363, 365, 506, 34 भादवी कायदा प्रमाणे गुन्हा दाखल असून तपास सपोनि / श्री अदित्य लोणीकर, मो.क्र. 9422336474 हे करीत आहेत.