माळाकोळी येथे बैठक
माळाकोळी ; एकनाथ तिडके
मागील आठ दिवसापासून माळाकोळी गावात भुगर्भातुन आवाज येत आहेत व हादरे जाणवत आहेत, या संदर्भाने प्रशासन दक्ष असून जनतेने न घाबरता सावधानता बाळगणे आवश्यक आहे, या संदर्भाने आम्ही वरिष्ठांशी संपर्क साधला असून भूगर्भशास्त्रज्ञ लवकरच माळाकोळी येथे घेऊन याबाबत निश्चित पणाने भूगर्भात काय होत आहे याबाबत निष्कर्ष निघेल तोपर्यंत माळाकोळी येथील नागरिकांनी सावधान बाळगून प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन तहसीलदार श्री. विठ्ठल परळीकर यांनी केले आहे, तहसीलदार परळीकर यांनी माळाकोळी येथील ग्रामपंचायत कार्यालय येथे भेट देऊन जनतेशी संवाद साधला.
यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले माळाकोळी येथे मागील वर्षाप्रमाणे या वर्षी सुद्धा भूगर्भातून आवाज येणे व हादरे जाणवणे असा प्रकार होत आहे या संदर्भाने आम्ही वरिष्ठांशी संपर्क साधला आहे व प्रशासन दक्ष असून जनतेने आता दक्षता बाळगून सतर्क राहणे आवश्यक आहे ज्यांची मातीची घरे आहेत त्यांनी विशेष लक्ष देऊन तात्पुरत्या स्वरूपात स्थलांतरित होऊन दक्षता बाळगावी.
यापुढे प्रशासन भूकंप आल्यानंतर नागरिकांनी घ्यावयाच्या दक्षतेच्या संदर्भाने जनजागृती करणार आहे याबाबत आम्ही तशा सूचना ग्रामपंचायत कार्यालय माळाकोळी यांना दिले आहेत असेही ते म्हणाले.
माळाकोळी ग्राम पंचायतीच्या वतीने जनतेत जनजागृती करून कच्चा घरांचा सर्वे करून त्या लोकांची जि.प.शाळा किंवा मंगल कार्यालयात तात्पुरती व्यवस्था करण्याची सुचना ही ग्रामपंचायत ला देण्यात आली असल्याची माहिती त्यांनी दिली.
या संदर्भाची माहीती जिल्हाधिकारी कार्यालयास देण्यात आली असून नांदेड विद्यापीठातील भुगर्भा संदर्भात माहिती देणारी टिम दोन दिवसात भेट देणार असल्याचे त्यांनी सांगितले
यावेळी लोहा तहसीलदार श्री.परळीकर यांच्यासमवेत ,नायब तहसीलदार श्री.बोरगांवकर ,मंडळ अधिकारी श्री.भोसीकर ,पंचायत समिती सदस्य प्रतिनिधी ,श्री.जनार्दन तिडके , सरपंच श्री. चंद्रमणी मस्के, स.पो.नि.श्री. घाटे तलाठी श्री.संदीप फड , ग्राम विस्तार अधिकारी श्री दावणगावे ,तांबरे गावातील नागरिक काशीनाथ जोंधळे, बाळु तिडके, श्याम बयास पत्रकार विनोद मस्के, दत्ता बयास सह इतर नागरिक उपस्थित होते