कंधार येथिल आर्यवैश्य गणेश मंडळाच्या वतीने ऑनलाईन चित्रकला स्पर्धाचे आयोजन


कंधार ; 

  दरवर्षी प्रमाणे कंधार येथिल आर्यवैश्य गणेश मंडळाच्या वतीने विनामुल्यऑनलाईन चित्रकला स्पर्धा २०२० चे आयोजन करण्यात आले आहे.सदरील स्पर्धा कोरोना महामारी मुळे ऑनलाईन केली आहे.
गणेश उत्सव ,झाडे लावा झाडे जगवा,स्वच्छ भारत,गणेश स्केच ,सेव्ह गर्ल चाईल्ड ,या विषयावर सदरील ऑनलाईन चित्रकला स्पर्धाचे आयोजन केले आहे.दि.२५ ते ३० अॉगस्ट या कालावधीत सदर स्पर्धा होणार आहे.
 आपले चित्र “आर्यवैश्य गणेश मंडळ,कंधार” फेसबुक ग्रुप वर  विषया प्रमाणे अपलोड करायचे आहे.
फेसबुक वर अपलोड करण्यासाठी  फॉरमॅट

 #कंधारचा_मानाचा_गणपती

#आर्यवैश्य_गणेश_मंडळ_कंधार

#तुमचं नाव  


 या पद्धतीने करायचे आहे.

स्पर्धेत भाग घेण्यासाठी नियम व अटी पुढील प्रमाणे आहेत.
१.चित्र काढलेल्या पेज वर तुमचं नाव व नंबर. 
२.चित्र हे कलर किंवा पेन्सिनल स्केच ग्राह्य धरल्या जातील.
३.मंडळाने दिलेल्या Registration लिंक वर Register करणे बंधकारक आहे.
४.निकाल व बक्षीस वाटप दि.२ सप्टेंबर रोजी ऑनलाईन करण्यात येणार असून

५. पारितोषिक हे स्पर्धकाने काढलेल्या चित्रा वर आणि चित्राला मिळालेल्या फेसबुक लाईक वर ठरवण्यात येणार आहे.

६.काठलेले चित्र स्पर्धकांने दि .३०-८-२०२० पर्यंत चित्र अपलोड करणे अनिवार्य आहे.सदर स्पर्धेत वयाची आट नाही,कुठल्याही वयोगटातील व्यक्ती भाग घेऊ शकतात.
विजेत्यांच्या पारितोषिका ची रक्कम ऑनलाईन पद्धतीने त्यांच्या फोन पे ,गुगल पे ,पेटीएम , द्वारे देण्यात येईल.
 सदरील बक्षिसे ही आर्य वैश्य गणेश मंडळ व मामडे ज्वेलर्स,कंधार  तर्फे असून

प्रथम पारितोषिक : ५५१/- रुपये,

द्वितीय पारितोषिक दोन राहणार असून प्रत्येक २५१/- रुपये,
तृतीय पारितोषिक तीन असून प्रत्येकी १५१/- रुपये बक्षिस आहे.

आणि चतुर्थ बक्षिस चार ठेवण्यात आली असून प्रत्येकी १०१ रुपये असे आहे.

तसेच हाहभागी सर्वांना ई प्रमाणपत्र (पीडीएफ) मिळणार आहे.


स्पर्धेच्या अधिक माहीतीसाठी संत्यम गडपलेवार 9421551811,

विपूल मामडे 7507258011, यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन

आर्यवैश्य गणेश मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *