फुलवळ मधून पहिले हृदयरोग तज्ञ डॉ. राहुल पटणे .

 

फुलवळ (धोंडीबा बोरगावे )

कंधार तालुक्यातील फुलवळ येथील रहिवासी असलेले शासकीय ठेकेदार माधवराव पटणे यांचे चिरंजीव डॉ. राहुल पटणे यांनी नुकतीच हृदयरोग तज्ञ ही पदवी संपादन केली असून फुलवळ मधून पहिले हृदयरोग तज्ञ होण्याचा मान त्यांनी मिळवला असल्याने सर्व स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

डॉ.राहुल पटणे यांचं प्राथमिक शिक्षण नांदेड येथे तर माध्यमिक व उच्यमाध्यमिक शिक्षण अहमदपूर येथे झाले. त्यानंतर एमबीबीएस बागलकोट कर्नाटक येथे झाले त्यानंतर डीएम कॉर्डलॉजिस्ट ची पदवी एमजीएम मेडिकल कॉलेज औरंगाबाद येथे त्यांनी पूर्ण केले.

फुलवळ येथील नामांकित शासकीय ठेकेदार स्वर्गीय दिगंबरराव पटणे यांचे ते पुतणे आहेत.

 

 

लवकरच जनसेवेसाठी कार्यरत होऊन गरजूंना मदतीचा हात म्हणून जमेल तशी सेवा देणार असे डॉ. राहुल पटणे यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *