सिन्नर येथे कोविड-१९ चित्ररथाचा समारोप!


नाशिक दि 27 


  सिन्नर तालुक्यात नोकिया च्या अर्थ साहयाने व    ‘सेव्ह द चिल्ड्रन’ आणि ‘सेंटर फॉर युथ डेव्हलपमेंट अँड ऍक्टिव्हिटीज’ यांच्या संयुक्तविद्यमाने व  सिन्नर तालुक्यात कोविड-१९ चित्ररथाचा समारोप करण्यात आला.

कोरोना संसर्गाचे वाढते प्रमाण पाहता त्यावर मात करण्यासाठी save the children संस्थेच्या ईप्सित दास, वरिष्ठ कार्यक्रम व्यवस्थापक  प्रवीण जाधव( CYDA संचालक) तसेच सिन्नर तालुक्यातील आरोग्य अधिकारी डॉ. बच्छाव याच्या मार्गदर्शनातुन  सिन्नर तालुक्यात कोविड-१९ जनजागृती सप्ताह दिनांक 15 ते 22 ऑगस्ट दरम्यान राबवण्यात आला होता. जिल्हा परिषद नाशिक यांच्या सहयोगातून तसेच CYDA  संस्थेमार्फत तालुक्यातील विविध गावांमध्ये कोरोना संदर्भात गाण्याच्या माध्यमातून हात धुण्याचे प्रशिक्षणातून प्रबोधन करण्यात आले. 15 ऑगस्ट या दिवशी रथाचा प्रारंभ करण्यात आला होता याप्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब शिरसागर, मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांच्या उपस्थितीत उद्घाटन पार पडले.

 या रथाचा प्रारंभ कोमलवाडी या गावातून करण्यात आला असून चित्ररथाचा समारोप पाथरे बुद्रुक या गावात करण्यात आला याप्रसंगी  धनंजय दिघे (सहाय्यक व्यवस्थापक) गावचे सरपंच, उपसरपंच, शाळा समिती अध्यक्ष तसेच CYDA संस्थेचे योगेश नेरपगार (प्रकल्प समन्वयक), हा उपक्रम यशस्वी रित्या पार पाडण्यासाठी निकिता जंगम विकास मस्के, भाऊसाहेब शेळके, हर्षदा हिंडे यांनी प्रयत्न केले  कोविड-१९ चित्र रथ या उपक्रम च समारोप करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *