कंधार ; तालुक्यातील हाळदा येथिल आत्महत्या ग्रस्त शेतकरी घनश्याम मोरे यांच्या कुटुंबीयांना लोकप्रिय,कर्तव्यदक्ष आमदार शामसुंदरजी शिंदे यांच्या हस्ते 1 लाख रुपयाचा धनादेश देण्यात आला .
आमदार शामसुंदरजी शिंदे यांनी मयत शेतकरी घनश्याम मोरे यांच्या कुटुंबीयांच सांत्वन केले यावेळी विलास भुरपल्ले पो पाटील, रावसाहेब शिंदे,विजय गुरुजी मंदावाड, जितेंद्र मंदावाड,तलाठी धुधाटे व गावकरी उपस्थित होते .