जेष्ठ कवयित्री विमल शेंडे लिखीत ‘उजेडाची नाव’ कविता संग्रहाचा ८ ऑक्टोंबर रोजी प्रकाशन सोहळा

 

नांदेड – येथील प्रतिथयश कवयित्री विमल शेंडे लिखीत ‘उजेडाची नाव’ या कविता संग्रहाचा प्रकाशन सोहळा दि. ८ ऑक्टोंबर २०२२ रोजी सायंकाळी ५.३० वाजता नांदेड शहरातील कुसूम सभागृहात संपन्न होणार आहे.

भदन्त विनयबोधीप्रिय थेरो यांच्या हस्ते या कवितासंग्रहाचे प्रकाशन होणार असून सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ कवयित्री प्रा. संध्या रंगारी ह्या राहणार आहेत तर ज्येष्ठ चित्रकार बळी खैरे यांचा यावेळी सत्कार करण्यात येणार आहे. या कवितासंग्रहावर सामाजिक कार्यकर्ते प्रा. सुभाष गडलिंग, सामाजिक कार्यकर्त्या सुप्रिया गायकवाड व समिक्षक प्रा. डॉ. कमलाकर चव्हाण हे भाष्य करणार आहेत.

विमल शेंडे यांनी यापूर्वी दोन कवितासंग्रह लिहिले असून ‘उजेडाची नाव’ हा त्यांचा तिसरा कवितासंग्रह आहे. हा कवितासंग्रह इसाप प्रकाशनने सिद्ध केला आहे.

या कविता संग्रहाच्या प्रकाशन सोहळ्यास जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन कल्चरल असोसिएशन नांदेड, अक्षरोदय साहित्य मंडळ नांदेड, सिद्ध नागार्जुन मेडिकल असोसिएशन नांदेड व इसाप प्रकाशन नांदेड यांच्यावतीने करण्यात आले आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *