माधवराव सादलापुरे सेवानिवृत्त..

 

फुलवळ ; ( धोंडीबा बोरगावे )

फुलवळ ता.कंधार येथील रहिवासी असलेले आणि सहाय्यक निबंधक सहकारी संस्थेत कार्यरत असलेले माधवराव संभाजीराव सादलापुरे हे नुकतेच मुख्य लिपिक पदावर कार्यरत असतांना सेवानिवृत्त झाले , त्याबद्दल उर्वरित आयुष्य निरोगी व भावी काळ समाधानकारक जावा यासाठी सर्वच स्तरातून त्यांच्यावर शुभेच्छारूपी अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

माधवराव सादलापुरे यांची सहाय्यक निबंधक सहकारी संस्थेत कनिष्ठ लिपिक म्हणून ता.१३ सप्टेंबर १९९१ रोजी छत्रपती संभाजी महाराज नगर (औरंगाबाद ) जिल्ह्यातील कन्नड येथे नियुक्ती झाली होती. त्यानंतर त्यांनी कंधार , मुखेड , अहमदपूर व लोहा आदी ठिकाणी सेवा दिली.

लोहा येथील कार्यालयात कार्यरत असतांना मुख्य लिपिक पदावरून ते ता. ३० सप्टेंबर २०२२ रोजी सेवानिवृत्त झाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *