फुलवळ ( धोंडीबा बोरगावे )
शैक्षणिक वर्ष २०२२-२३ च्या शाळांना जून महिन्यातच सुरुवात झाली. शालेय विद्यार्थ्यांना शासनाच्या वतीने मोफत देण्यात येणारे पुस्तक आणि गणवेश वेळेत मिळणे विद्यार्थी व पालकांना अपेक्षित असते. तसे पाहता पुस्तके मिळाली परंतु शाळा सुरुवात होऊन पाच महिने झाले तरीही गणवेश मात्र मिळेचनात. तेंव्हा दै. सकाळ मध्ये वारंवार बातम्या छापून यासंदर्भात पाठपुरावा केला होता. त्याच बातमीचा परिणाम की आज ता. ७ ऑक्टोबर रोजी तब्बल पाच महिन्यानंतर जि. प. केंद्रीय प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना गणवेश झाले वाटप.
कंधार तालुक्यातील फुलवळ येथील जि.प. केंद्रीय प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना मोफत गणवेश वाटप येथील शालेय समितीचे अध्यक्ष , उपाध्यक्ष, आणि सदस्य यांच्या हस्ते करण्यात आहे.
यावेळी मुख्याध्यापक बालाजी केंद्रे ,शालेय समितीचे अध्यक्ष मंगेश पांचाळ , उपाध्यक्ष साईनाथ बोरगावे ॲड.उमर शेख, ग्रामपंचायत सदस्य प्रवीण मंगनाळे, ग्रामपंचायत सदस्य श्रीकांत मंगनाळे, कपाळे सर, मंगनाळे सर ,काब्दे सर होनराव मॅडम, पुरानिक मॅडम, गवलवाड मॅडम, हांन्डे मॅडम , गवळे मॅडम, आदींची उपस्थिती होती.