आज आलेगाव ता.कंधार येथील ग्रामपंचायत आमदार श्यामसुंदर शिंदे साहेबांच्या नेतृत्वात दणदणीत विजय मिळवला.आज सरपंच निवड कार्यक्रमास शेतकरी कामगार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा तथा सामाजिक कार्यकर्त्या सौ आशाताई श्यामसुंदर शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती .
नवनिर्वाचित सरपंच बळवंत पाटील वर्ताळे,उपसरपंच सारजाबाई मारोतराव मोरे,सदस्य सुंदरबाई लक्ष्मण मोरे,सदस्य प्रकाश मोरे,सदस्य मोहन मोरे,सदस्य रुकमिनबाई कुद्रे,सदस्य मोहन आंबटवाड यांचा सौ.आशाताई शिंदे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला व पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या .
यावेळी गावकऱ्यांच्या वतीने आशाताई यांचा यथोचित सत्कार करण्यात आला यावेळी बोलताना आशाताई म्हणाल्या की,गावात आता गट तट विसरून एकोपा राखूनच आपण गावातील विकासकामे करावीत यामुळे कामे लवकर आणि अधिक चागले होतील असे प्रतिपादन केले .
याप्रसंगी आशाताईंनी गावकऱ्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या यावेळी नागोराव पाटील आलेगावकर,पोलीस पाटील वसंतराव पाटील मोरे,दादाराव पाटील मोरे,तंटामुक्ती अध्यक्ष सज्जन पाटील मोरे,सरपंच प्रतिनिधी गिरीश डीगोळे,आनंद पाटील मोरे,प्रकाश बळीराम मोरे,खुशाल पाटील मोरे,बळवंत मोरे,परमेश्वर वर्ताळे,अविनाश आंबटवाड,दिगंबर आंबटवाड सह कार्यकर्ते,गावकरी उपस्थित होते.