नुतन गटशिक्षणाधिकारी बालाजी शिंदे यांचा खाजगी प्राथमिक शिक्षक महासंघाच्या वतीने सत्कार

 

कंधार ; प्रतिनिधी

कंधारचे नुतन गटशिक्षणाधिकारी म्हणून बालाजी शिंदे आज रुजू झाले आहेत . त्याबद्दल त्यांचा खाजगी प्राथमिक शिक्षक महासंघ व मुख्याध्यापकांच्या वतीने सत्कार करण्यात आला .

कंधार तालुक्यातील शिक्षणाची शिराढोण येथील बालाजी शिंदे यांची कंधार तालुक्याचे नुतन गटशिक्षणाधिकारी नेमणूक करण्यात आली.बालाजी शिंदे हे कंधार तालुक्यातील शिराढोण येथील रहिवासी असून त्यांनी काही काळ प्राथमिक शिक्षक म्हणून काम केले. २००८ मध्ये स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होऊन शिक्षण विस्तार अधिकारी पदावर रुजू झाले .यापूर्वी त्यांनी मुखेड, हिमायतनगर या तालुक्यामध्ये गटशिक्षणाधिकारी म्हणून काम केले आहे.

शिक्षण क्षेत्रात आमूलाग्र बदल घडवून आणणारे तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ. श्रीकर परदेशी यांच्या शैक्षणिक संरचना बदल टीममधील ते प्रमुख सहकारी होते.

 

त्यांच्या उत्कृष्ट कार्याची दखल घेऊन त्यांची ही निवड करण्यात आली आहे .गटशिक्षणाधिकारी म्हणून बालाजी शिंदे आज दि . १२ ऑक्टोबर रोजी रुजू झाले त्या बद्दल खाजगी प्राथमिक शिक्षक महासंघ व मुख्याध्यापकांच्या वतीने सत्कार करण्यात आला .

यावेळी कंधार तालुकाध्यक्ष भास्कर कळकेकर,हरीहर चिवडे, बसवेश्वर मंगनाळे , राजहंस शहापुरे , एम.एस. जाधव , महंमद अनसारोदीन, मंजूर परदेशी, वाघमारे डी. जी ., सुभाष मुंडे , शिवा बचूवार , प्रदीप कदम , आदीसह खाजगी प्राथमिक शिक्षक महासंघ पदाधीकारी व मुख्याध्यापक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *