कंधार/प्रतिनिधी
मंगलसांगवी ता.कंधार येथील भारतीय जवान कृष्णा बालाजी वाघमारे याची आफ्रिका खंडातील लेबनान येथे कार्यरत असलेल्या शांती सेनेसाठी निवड झाली.
जवान वाघमारे हा बुधवारी सकाळी दहा वाजता दिल्ली येथून लेबनानकडे रवाना झाला. शांतीसेनेत त्याची निवड झाल्याबद्दल मंगलसांगवीसह परिसरात त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
कृष्णा वाघमारे हा २०१४ मध्ये भारतीय सैन्यात भरती झाला.त्याने मध्यप्रदेश (सागर) येथे सैनिक पूर्व प्रशिक्षणात उत्तम प्रशिक्षण घेत आपली छाप पाडली. त्याची प्रथम नियुक्ती राजस्थान (बिकानेर) येथे करण्यात आली.नंतर जम्मू-कश्मीर, हिमाचल प्रदेश व सध्या तो दिल्ली येथे कार्यरत आहे. त्याने आज पर्यंत आठ वर्षे सहा महिने सेवा बजावली आहे.कमी कालावधीत उत्तम कामगिरी बजावत असल्याने त्यांची शांतीसेनेसाठी निवड करण्यात आली.
भारताच्यावतीने दक्षिण आफ्रिका खंडातील लेबनान येथे असलेल्या शांतीसेनेत त्याची निवड झाली आहे.लष्करातील निवडक सैनिकांना तेथे जाण्याची संधी मिळते.अविरतपणे भारतीय सैन्यात सेवा बजावणाऱ्या व उत्तम प्रदर्शन करणाऱ्या सैनिकांचीच शांतीसेनेत निवड होत असते. भारतीय सैन्यदलातील १४ लाख सैन्यातून आठशे सैनिकांची शांतिसैन्यासाठी निवड करण्यात आली.त्यात कृष्णा वाघमारे या जवानांचा समावेश आहे.कंधार तालुक्यातील सैनिकांसाठी ही अभिमानाची बाब म्हटले तर वावगे ठरणार नाही.