लोहा तालुक्यातील शेतकऱ्यांनी ऑनलाईन ई पीक नोंदणी करावी ; तहसीलदार व्यंकटेश मुंडे

लोहा ; आंतेश्वर कागणे ( युगसाक्षी प्रतिनिधी लोहा)

लोहा तालुक्यातील शेतकरी बांधवांना आवाहन करण्यात येत आहे की,
लोहा तालुक्यातील ई पीक पाहणी केवळ ३६ % झाली असुन अदयाप ४२००० हेक्टर क्षेत्राची ई पीक नोंदणी करणे बाकी आहे
पीक विमा व ईतर शासकीय अनुदान साठी ई पीक नोंदणी महत्वाची आहे त्यामुळे शिल्लक क्षेत्र व खातेदार शेतकरी यांची ई पीक नोंदणी पूर्ण करून घेण्यात यावी असे आवाहन तहसीलदार व्यंकटेश मुंडे यांनी केले आहे.

आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व प्रगतीशील शेतकरी,सरपंच , उप सरपंच , चेअरमन , पो पाटील , रा भा दुकानदार , विद्यार्थी , कोतवाल यांचे मदतीने स्वंयसेवक गट तयार करुन ई पीक नोंदणी करिता सर्वानी जास्तीत जास्त प्रयत्न करावेत एका मोबाईलवर १०० खातेदार यांची नोंदणी करता येते .

प्रत्येक गावात किमान १० ते १५ volunteer ई पीक नोंदणी करिता नेमावेत असे तलाठी कृषी सहायक व ग्रामसेवक या सर्वांना आवाहन करणयात आलेले आहे असे सदरील प्रतिनिधी शी बोलताना तहसीलदार व्यंकटेश मुंडे यांनी सांगितले आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *