घोडज कंधार रस्त्याच्या बोगस कामा विरोधात माजी सैनिक संघटना रास्ता रोको  करणार – माजी सैनिक संघटणा जिल्हाध्यक्ष बालाजी चुकलवाड

कंधार ; घोडज कंधार रस्त्याच्या कामात डांबर शोधूनही सापडत नाही अभियंता यांच्या आशीर्वादाने गुत्तेदार बोगस काम करत आहेत सदरील  बोगस कामा विरोधात माजी सैनिक संघटना सक्रीय झाली असून या बोगस रस्त्याच्या कामाच्या विरोधात  रास्ता रोको  करणार अशी माहिती माजी सैनिक संघटणा जिल्हाध्यक्ष बालाजी चुकलवाड यांनी दिली .

माजी सैनिक संघटना तालुक्यातील बोगस काम व विविध विकासाच्या कामावरून  सक्रिय असते . तालुक्यातील अनेक गोरगरिबाचे प्रश्न सोडवण्यासाठी व भ्रष्टाचाराचा नायनाट करण्यासाठी गेल्या अनेक वर्षापासून माजी सैनिक संघटना जिल्हाध्यक्ष बालाजी चुकलवाड यांच्या नेतृत्वाखाली कंधार तालुक्यात माजी सैनिक संघटना अँक्टीव मोडवर आहे .

 

 

अनेकांच्या प्रश्नाला वाचा फोडता फोडता माजी सैनिक संघटना सर्वांच्याच लोकप्रिय झाली आहे . कंधार घोडज रस्त्याचे सध्या काम चालू असून या कामाची पाहणी अधिकारी पदाधिकारी व सामान्य नागरिक व लोकप्रतिनिधींनी केली . तरीही पण या सर्वांनी डोळे झाकून त्याकडे दुर्लक्ष केले परंतु माजी सैनिक संघटनेच्या निदर्शनात ही बाब येताच तात्काळ माजी सैनिक संघटनेने सदरील काम दर्जेदार करावे यासाठी संबंधित बांधकामा  अभियंता व गुतेदार यांना आवाहन केले असून बोगस कामाच्या विरोधात रस्ता रोको आंदोलन करणार असा इशारा आज त्यांनी दिला आहे .  यावेळी माजी सैनिक संघटनेचे कंधार तालुका अध्यक्ष व पदाधिकारी उपस्थित होते .

 

माजी सैनिक संघटनेचा पदाधिकाऱ्यांनी सकाळचा नाष्टा घोडज रोडवरती व  दुपारचे जेवण पण घोडज रोडवरतीच करणार आहेत पण जेई आल्या शिवाय आणि कामाची सुरुवात होऊ देणार नाही अशी भूमिका माजी सैनिकांनी घेतली .

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *