राज्यस्तरीय कायाकल्प,जिल्हा गुणवत्ता आश्वासन पर्वेशक पथकांची (LAQSH, ENQS)कंधार येथिल ग्रामीण रुग्णालयाला भेट

कंधार ; प्रतिनिधी

आज दि:-17/10/2022 रोजी कंधार ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुर्यकांत आर. लोणीकर यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय कायाकल्प पथकाची पाहणी 11:00 वा ग्रामीण रुग्णालयात दाखल झाली.या राज्यस्तरीय कायाकल्प पथकांचे मुख्य अधिकारी डॉ. बापू निकाळजे ( जिल्हा गुणवत्ता आश्वासन सुपरवायझर बीड) व डॉ.राम आव्हाड (निवासी वैद्यकीय अधिकारी बीड),आणि डॉ.अर्चना तिवारी मॅडम( कायाकल्प जिल्हा प्रतिनिधी) त्यांचे सर्व अधिकाऱ्याचे पथक यांनी ग्रामीण रुग्णालयाची पाहाणी केली.

यात प्रामुख्याने कमी मनुष्यबळ असतानाही डॉ लोणीकर यांनी सर्व बाबी कडे लक्ष दिल्यामुळे व संस्था विकसीत केल्यामुळे वरीष्ठ अधिकारी यांनी डॉ लोणीकर साहेबांचे विशेष कौतुक केले.

 

डॉ.राम आव्हाड (निवासी वैद्यकीय अधिकारी बीड),व डॉ. बापू निकाळजे ( जिल्हा गुणवत्ता आश्वासन सुपरवायझर बीड) आणि डॉ.अर्चना तिवारी मॅडम( कायाकल्प जिल्हा प्रतिनिधी नांदेड) त्यांचे सर्व अधिकाऱ्याचे पथक हे अधिकारी राज्यस्तरीय कायाकल्प पथकात होते.या अधिकारी यांनी सर्व विभाग निहाय रेकॉड चेक करून कौतुक केले वॉर्डातील स्वच्छता हॉस्पिटल ची स्वच्छता आसपासचा परिसर स्वच्छता सर्व वॉर्डातील स्वच्छता सर्व रेकॉर्ड मेंटेन प्रसूती ग्रह स्वच्छता, ऐकलंमसियावॉर्ड, दंत शल्यचिकित्सक विभाग ,आय सी टी सी विभाग, प्रसुतीपश्चात वार्ड, एक्स-रे विभाग, पुरुष जनरल वार्ड , अपघात विभाग निवासी डॉक्टर विभाग ,RBSK विभाग, कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया विभाग ,स्त्रक्रिया गृह, पाकगृह,RKSK विभाग,NCD विभाग, आयुष वैद्यकीय अधिकारी विभाग , बालक लसीकरण विभाग, नोंदणी विभाग, प्रयोगशाळा विभाग, कोविड लसीकरण विभाग ,या सर्व विभागातील स्वच्छता रेकॉर्ड मेंटनस पाहून समाधान व्यक्त करत कौतुक केले.

ग्रामीण रुग्णालयाचे दंत शल्यचिकित्सक डॉ.महेश पोकले सर, यांनी प्रास्तविक केले .उपस्थित ग्रामीण रुग्णालयातील सर्व वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *