अखेर पोटाची खळगी भरलीचं नाही….! धावरी शिवारात वीज  कोसळून ३ ऊस कामगार  जागीच ठार तर एक जखमी

आंतेश्वर कागणे (युगसाक्षी  प्रतिनिधी लोहा)

लोहा तालुक्याला दि. १८ ऑक्टोंबर रोजी मंगळवारी दुपारी ३.३० वाजेच्या दरम्यान परतीच्या पावसाचा जोरदार तडाखा बसला असुन विजेच्या कडकडाटासहित  जोरदार पाऊस झाला तर
धावरी येथे मोठ्या प्रमाणात  वीजेचा  कडकडाट होऊन पाऊस झाला आहे .त्यामध्ये धावरी शिवारात वीज कोसळून  ३ कोसळून जागीच ठार झाले तर एकजण गंभीर जखमी झाले असुन त्यांना लोहा येथील शासकीय रुग्णालयात प्राथमिक उपचार करुन पुढील उपचारासाठी  नांदेडला हलविण्यात आले आहे.

 

याबाबत अधिक माहिती अशी की दि. १८ ऑक्टोंबर २०२२ रोजी दुपारी साडेतीन वाजेच्या दरम्यान

धावरी शिवारामध्ये केशव भिमराव वाकडे शेतकऱ्यांच्या शेतावर  ऊस तोडीसाठी टोळी आली होती अचानक विजेचा कडकडाट झाला आणी  वीज पडली त्यामध्ये
माधव पिराजी डुबूकवाड
वय ४५वर्ष  रा.पानभोसी
पोचीराम श्याम गायकवाड ( वय ४५) रा.पेटपिपळगाव ता .पालम
रूपाली पोचीराम गायकवाड (वय १६ वर्ष)
रा.पेटपिपळगाव ता .पालम
    यांच्या अंगावर वीज पडल्याने ते जागीच ठार झाले तर  आहे  तर पुजा माधव डुबूकवाड वय १७ वर्ष रा पानभोसी ता.कंधार ही जख्मी झाली असून त्याला पुढील उपचारासाठी नांदेड ला हलविण्यात आले आहे. ही घटनेची माहिती  कळताच परिसरामध्ये हळूहळू व्यक्त होत आहे.
विषेश म्हणजे या दुर्घटनेत एकाच कुटुंबातील  वडील आणि त्याची मुलगी  हे दोघे एकाच वेळी मृत्यूमुखी पडल्यामुळे  सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

यासंदर्भात लोहा  तहसीलदार व्यंकटेश मुंडे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी फोन उचलला  नाही.
  त्यांना  दोन तालुक्याचा आणि तीन  ठिकाणचा चार्ज असल्यामुळे त्यांना मोठ्या प्रमाणात कामाचा ओढा झाला आहे त्यासाठी शासनाने त्यांचे काम कमी करून त्यांची बदली करावी अशी मागणी जनतेतून होते.
तर उपविभागीय अधिकारी कंधार शरद मंडलिक यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले मी मिंटीग मध्ये आहे मी  घटना स्थळी जाऊन भेटणार आहे. धावरी येथे वीज कोसळून तीन ऊस कामगार ठार झाल्याची माहिती मिळताच घटनास्थळी माणुसकी दाखवून मदतीसाठी धावरीचे सरपंच माणिकराव वाकडे, उपसरपंच अशोक गिते, अभंग पाटील गाडेकर, रायवाडीचे पोलीस पाटील वैजनाथ पांचाळ, रुकमाजी पवार, लोहा पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक संतोष तांबे,पोहेका सचीन गिरी, जमादार अशोक केंद्रे , नायब तहसीलदार अशोक मोकले, तलाठी कदम आदी धावले
तसेच  ग्रामीण रुग्णालय येथे डीवायएसपी मारोती थोरात यांनी भेट दिली.

सध्या परतीच्या पावसांने जिल्ह्यात व राज्यात हाहाकार माजविला असुन अनेक ठिकाणी वीज कोसळून शेत शेतमजूर मरण पावत आहेत तर या पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे ही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
शासनाच्या हवामान खात्याने याकडे तात्काळ लक्ष देऊन विजेच्या कडकडाटासहित मुसळधार पाऊस होण्याची शक्यता असल्यास २४ ते ४८ तासांच्या अगोदर माहिती द्यावी अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *