कंधार प्रतिनिधी
शिवा अखिल भारतीय वीरसेव युवक संघटनेच्या वतीने गेल्या 27 वर्षापासून विविध क्षेत्रातील उत्कृष्ट काम करणाऱ्या मान्यवरांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते . या संघटनेच्या पुरस्कारात राज्यातील दोन उत्कृष्ट पत्रकारांना पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान केल्या जातो. 2022 चे पुरस्कार जाहीर झाले असून पत्रकारिता उत्कृष्ट राज्यस्तरीय पुरस्कार हिंदवी बाणाचे संपादक माधव भालेराव व पुण्यनगरीचे उपसंपादक कैलास लवंगडे यांना पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
शिवा संघटनेच्या वतीने गेल्या 27 वर्षापासून कार्तिकी शुद्ध पौर्णिमेच्या निमित्ताने बीड जिल्ह्यातील कपिलधारा येथे राज्यव्यापी मेळावा घेण्यात येतो या मेळाव्यात विविध क्षेत्रातील उत्कृष्ट काम करणाऱ्या मान्यवरांना पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान केला जातो यामध्ये पत्रकारांचाही समावेश आहे . 2022 च्या पुरस्कारामध्ये पत्रकारिता क्षेत्रांमध्ये उत्कृष्ट काम करणाऱ्या दोन पत्रकारांना पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे . यामध्ये कंधार येथील हिंदवी बाणा चे संपादक माधव भालेराव व पुण्यनगरीचे उपसंपादक कैलास लवंगडे यांना पत्रकारिता उत्कृष्ट राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे .
माधव भालेराव हे 2007 पासून पत्रकारिता क्षेत्रामध्ये काम करत आहेत . 2009 त्यांनी साप्ताहिक हिंदवी बाणा हे वृत्तपत्र काढून पत्रकारितेला सुरुवात केली. तेरा वर्षाच्या पत्रकारितेत त्यांनी निर्भीडपणे पत्रकारिता करून अन्यायाला वाचा फोडण्याचे काम केले आहे. शांत संयमी व अभ्यासू व्यक्तिमत्व असलेल्या माधव भालेराव यांनी पत्रकारीतेच्या माध्यमातून चांगला ठसा उमटविला आहे. त्यांना या पूर्वी पत्रकारिता क्षेत्रातील दोन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.