वीज पडून मृत्युमुखी पडलेल्या पानभोसी येथील डूबुकवाड कुटुंबियांस ४ लक्ष रुपये शासकीय मदत माननीय आमदार शामसुंदर शिंदे यांच्या हस्ते प्रदान

कंधार ; ऊसतोड कामगार असलेल्या चौघा जणांवर धावरी शिवारात १८ आॅक्टोबर २०२२ रोजी वीज पडली होती. यात तिघेजण जागीच ठार झाले तर सोळा वर्षीय मुलगी जखमी झाली होती. पानभोसी येथील माधव पिराजी डूबुकवाड वय ५० हे हे मयत झाले होते.

पानभोसी येथे मयत माधव यांच्या पत्नी
सुलोचना माधव डुबुकवाड (वय ४५ ) यांना ४ लक्ष रुपये शासकीय मदतीचा घनादेश आज पानभोसी येथे त्यांच्या घरी जाऊन लोहा कंघार मतदार संघाचे आमदार श्यामसुंदर शिंदे यांचे हस्ते वितरीत करणयात आला .आमदार महोदय यांनी इतर काही शासकीय योजनांचा लाभ देणेसाठी महसुल व पंचायत प्रशासनास सुचना केल्या जेणेकरून मयत माधव डूबुकवाड यांचे कुटुंबास ईतर मदतीचा आधार मिळेल .

यावेळी तहसीलदार व्यंकटेश मुंडे, राष्ट्रवादी किसान सेलचे प्रदेश सरचिटणीस व सरपंच प्रतिनिधी मनोहर पाटील भोसीकर, विश्वंभर डुबुकवाड,मनमथ नाईकवाडे ,
मंडळधिकारी हेमंत सुजलेगावकर , केशव भोसीकर व तलाठी एन सुंदरगुरवार, व रेणके यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

 

 

________________ advt .______

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *