कंधार ; खासदार राहुलजी गांधी यांच्या भारत जोडो पदयात्रे च्या नांदेड जिल्ह्यातील सहभागसाठी बहाद्दपुरा व फुलवळ सर्कल मधील प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक आज दि .२९ ऑक्टोबर रोजी घेण्यात आली बहाद्दपुरा व फुलवळ सर्कल मधील सर्वच कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन नांदेड जिल्हा कॉग्रेस कमिटीचे सरचिटणीस संजय भोसीकर यांनी बैठकीमध्ये मार्गदर्शन करताना केले .
बहाद्दपुरा व फुलवळ सर्कल मधील प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठकीत कंधार तालुका कॉग्रेस कमिटीचे अध्यक्ष बालाजीराव पांडागळे, माजी जिल्हा परिषद सदस्या सौ.वर्षाताई भोसीकर, नागोराव पाटील मोरे, हनुमंतराव पाटील पेठकर,अभिजित हळदेकर,सतिश देवकत्ते, वसंत घोरबांड, बाळासाहेब पवार, स्वप्निल परोडवाड, आदींसह बहाद्दपुरा व फुलवळ सर्कल मधील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते .