संत बाबा जगदीश महाराजांच्या मार्गदर्शनाखाली गोशाळेत होत आहे पुण्य वाटपाचे काम-माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण

नांदेड(प्रतिनिधी)-खडकुत येथील गोशाळेत संत बाबा जगदीश महाराजांच्या मार्गदर्शनाखाली गोबर गॅस प्रकल्पाची सुरुवात हे चांगले काम असून या गोशाळेतून पुण्य वाटल्या जात असल्याचे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी केले.
नांदेड शहरापासून जवळ असलेल्या खडकुत येथील गोशाळेत गोबर गॅस या प्रकल्पाच्या भुमिपुजन कार्यक्रमात माजी मुख्यमंत्री आ.अशोकराव चव्हाण यांनी मार्गदर्शन केले. यावेळी व्यासपीठावर संतबाबा जगदीश महाराज, माजी खा.भास्करराव पाटील खतगावकर, माजी आ.अमीताताई चव्हाण, आ.अमरनाथ राजूरकर, माजी आ.ओमप्रकाश पोकर्णा, महापौर सौ.जयश्री पावडे, कॉंगे्रसचे जिल्हाध्यक्ष गोविंदराव शिंदे नागेलीकर, भाऊराव कारखान्याचे चेअरमन गणपतराव तिडके, खडकुतचे सरपंच दमयंती बुक्तरे आदी मान्यवर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
पुढे बोलतांना अशोक चव्हाण म्हणाले की, गोशाळेच्या काम बाबाजींच्या मार्गदर्शनाखाली योग्य चालत असून या गोशाळेत तब्बल 700 गाई आहेत. गाईला आपण माता समजतो त्याचे योग्य संगोपन झाले पाहिजे. बाबाजी गाईंची सेवा करत आहेत. हे पुण्याचे काम आहे. गोबर गॅस या प्रकल्पाची मान्यता जिल्हा परिषदेच्यावतीने देण्यात आली असून त्यासाठी 50 लक्ष निधी उपलब्ध करून देण्यात आला. साधारण 40 किलो बायोगॅस, तीन हजार लिटर बायो फटिलायझर तयार करण्यात येणार असून शेणामुळे होणारी दुर्गंधी व प्रदुषण रोखल्यास मदत होणारच पण त्यासोबत शेणातील वाया जाणाऱ्या मिथेन गॅसचा वापर ही करण्यात येणार आहे. शिवाय खडकूत येथील 80 घरांना त्याचा लाभ मिळणार आहे.
सदरील कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी आ.ओमप्रकाश पोकर्णा यांनी केले. यावेळी ओमधूत, हरिश तिवारी, कैलास जोशी, बिरबल यादव, नरेश दंडवते, प्रदीप चाडावार, कैलास शर्मा, बंडू दायमा, मनोज लोहिया, ओम गिल्डा, दडु पुरोहित, राजेंद्र शुक्ला, खांडील गुरुजी, किशोर यादव,विजय पोकर्णा, आनंद जोशी, अरुण काबरा, गणेश जाजू, कचरु बजाज, राजू पारसेवार, घनशाम गुडगीला, संजय भंडारी, कैलास अग्रवाल, कैलास करवा, नंदु जोशी, राहुल जांगीड, दिपक सुराना, किशोर राड, कैलास राड, जयप्रकाश तिवारी, श्रीकांत जोशी, पवन तिवारी, रुम्माजी मुखेडे, दिनकर शेट्टी, बजरंग शुक्ला आदींची यावेळी उपस्थिती होती.
चौकट
शंकरराव कंकाळाना मिळाला गोमातेचा आशीर्वाद
खडकुत गावातील शेतकरी शंकरराववकंकाळ यांनी कुळातील जमीन गोशाळेला दान दिली. त्यांच्या या सतकर्मामुळे त्यांच्या मुलाच्या दोन्ही मुली शासकीय कोट्यातून कुठलेही डोनेशन न भरता एमबीबीएसचे शिक्षण घेत आहेत. कंकाळ परिवाराला गोमातेचा आशीर्वाद लाभला असल्याचे गौरवोदगार माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी काढले.

माजी खा.भास्करराव पाटील खतगावकरांकडून 5 लाख जाहिर
नांदेडचे माजी खा.भास्करराव पाटील खतगावकर यांनी गो शाळेचे काम पाहुन तेथील शेड उभारणीसाठी 5 लाख रुपयाचा निधी जाहीर केला. त्यांच्या निर्णयाचे सर्वांनी मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *