माळाकोळी ; एकनाथ तिडके
मागील आठ दिवसांपासून माळाकोळी येथे भूगर्भातून आवाज येत असल्याचे व सौम्य धक्के जाणवत असल्याचा प्रकार घडत असल्यामुळे माननीय जिल्हाधिकारी श्री विपिन ईटणकर यांच्या आदेशानुसार
नांदेड येथील भुवैज्ञानिक श्री एस पी राठोड यांनी दिनांक 28 ऑगस्ट रोजी माळाकोळी येथे भेट देऊन पाहणी केली,प्राथमिक अंदाजानुसार सदर धक्के जास्तीच्या पावसामुळे बसत असल्याची माहिती त्यांनी दिली.
माळाकोळी येथे मागील वर्षापासून भूगर्भातून आवाज येणे व सौम्य धक्के जाणवणे असे प्रकार होत आहेत, यावर्षी सुद्धा मागील आठ दिवसांपासून माळाकोळी तील भूगर्भात आवाज येणे व सौम्य धक्के बसत असल्यामुळे
सदर बाब सरपंच चंद्रमणी मस्के व तलाठी श्री संदीप फड यांच्यामार्फत वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळविण्यात आली , त्यानंतर तहसीलदार श्री विठ्ठल परळीकर यांनी माळाकोळी येथे भेट देऊन पाहणी केली ,
व ग्रामस्थांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या , तहसीलदार श्री परळीकर यांनी दिलेल्या माहितीवरून मान. जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार नांदेड येथील भूवैज्ञानिक श्री एस पी राठोड यांनी दिनांक 28 ऑगस्ट रोजी माळाकोळी येथे भेट दिली. यावेळी त्यांनी माळाकोळी येथील खडका ची व इतर पाहणी केली, संपूर्ण प्रकाराची ग्रामस्थांकडून माहिती घेतली.
यावेळी ग्रामपंचायत येथे ग्रामस्थांशी व पत्रकारांशी बोलताना भूवैज्ञानिक श्री एस पी राठोड म्हणाले, मागील वर्षाचा व या वर्षाचा अनुभव पाहता जास्तीच्या पावसामुळे भूगर्भातील पोकळीमध्ये अशा प्रकारचे आवाज होणे व सौम्य धक्के जाणवले असे प्रकार होत असतात असाच प्राथमिक अंदाज आहे,
याबाबत भूकंपमापन केंद्र स्वामी रामानंद तिर्थ विद्यापीठ नांदेड येथे असून तेथील प्राध्यापक पी.विजयकुमार यांच्याशी आपले बोलणे झाले असून याबाबत निश्चित असा निष्कर्ष उद्यापर्यंत आपण कळवू असे ते म्हणाले.
मात्र यातून मोठ्या प्रमाणावर धोका होण्याचा संभव नाही तरीही कच्चे घर असलेल्या नागरिकांनी काळजी घेणे आवश्यक आहे असेही ते म्हणाले यावेळी सरपंच चंद्रमणी मस्के तलाठी श्री संदीप फड, ग्रामपंचायत सदस्य निवृत्ती केंद्रे, सुरज चाटे, श्यामसिंह बयास, निखिल मस्के, यांच्यासह नागरिक उपस्थित होते.