कंधार च्या ग्रामिण रुग्णालयात व्हेंटिलेटर, सोनोग्राफी मशीन उपलब्ध करुन द्या – एमआयएम ची मागणी


कंधार;


कंधार येथील शासकीय ग्रामीण रुग्णालय तालुक्यातील गोरगरीब रुग्णासाठी कामधेणू सारखी आहे. मोठ्या  आस्थेवाईकपणे आलेला रुग्ण रुग्णसेवेसाठी आवश्यक असणारे व्हेंटिलेटर व सोनोग्राफी मशीन उपलब्ध नसल्याने हिरमूसुन जात आहे.या बाबीचा येथील रुग्णांना त्रास होत आहे. वेळप्रसंगी नांदेड गाठेपर्यंत जीव गमवावा लागत आहे त्यामुळे तात्काळ व्हेंटिलेटर व सोनोग्राफी मशीन  कार्यान्वित करावी अशी मागणी कंधार तालुका एमआयएम च्या वतीने वैद्यकीय अधीक्षक यांना करण्यात आली आहे.

कंधार तालुका हा अतिशय दुर्गम व डोंगराळ भागातील असून.सदरी तालुका राष्ट्रकूट कालीन राजधानीचे ठिकाण असलेला सर्वात जुना तालुका आहे .शासकीय ग्रामीण रुग्णालय मध्ये व्हेंटिलेटर,सोनोग्राफी मशीन उपलब्ध नसल्यामुळे कंधार तालुक्यातील गंभीर आजारी पडलेल्या लोकांना रात्री बेरात्री उपचारासाठी नांदेड येथे जावे लागत आहे.
 नांदेड ला जाण्यासाठी जवळपास एक ते दिड तास लागतो त्यामुळे जीव सुध्दा जाण्याची शक्यता वाढते त्यामुळे शासकीय ग्रामीण रुग्णालय कंधार येथे व्हेंटिलेटर ,सोनोग्राफी मशीन ची सुविधा सुरू करणे अत्यंत आवश्यक आहे .कोविड 19 सारख्या जगातील महामारीच्या काळामध्ये दोन्ही उपकरणे चालु करणे गरजेचे आहे कारण शासकीय ग्रामीण रुग्णालयात ग्रामीण भागातून असंख्य नागरिक दररोज उपचारासाठी येथ असतात तसेच एक्स रे मशीन सुद्धा बंद पडलेली आहे .एक्सरे काढण्यासाठी रुग्णांची हेळसांड होत आहे त्यासाठी हे दोन्ही उपकरणे लवकरात लवकर उपलब्ध करण्याची मागणी एम आय एम तालुका अध्यक्ष मो. हमेदोद्दीन,सय्यद मिया सहाब, अहमद भाई,खालेद भाई,इरफान खान यांनी वैद्यकीय अधीक्षकाकडे निवेदनाद्वारे केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *