एक जानेवारीला मुख्यमंत्री म्हणून फडणवीस शपथ घेणार-बोरी (बु.) येथील महादेव मंदिर पाच कोटी विकास कामाचे भूमीपूजन प्रसंगी खा.चिखलीकर यांचे प्रतिपादन


कंधार ;
           महाराष्ट्रात तीन पक्षाचे सरकार असून कोणाचे पायपोस कोनात नाहीत. कधी सत्तेतील काँग्रेसचे आमदार नाराज तर कधी राष्ट्रवादीचे आमदार नाराज. तर कधी सेनेचे खासदार नाराज. या गोंधळामुळे हे सरकार किती दिवस चालेल हे माहीत नाही.

परंतू एक जानेवारी २०२१ रोजी महाष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस हे शपथ घेणार असल्याचे प्रतिपादन नांदेडचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी केले.

            कंधार तालुक्यातील बोरी (बु.) येथील महादेव मंदिर पाच कोटी विकास कामाचे भूमीपूजन नांदेडचे खासदार चिखलीकर व मुखेड-कंधारचे आमदार डॉ. तुषार राठोड यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी ग्रामपंच्यातच्यावतीने व महादेव मंदिर ट्रस्टच्यावतीने मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. यावेळी खासदार चिखलीकर बोलत होते.   

         पुढे बोलताना खा. चिखलीकर म्हणाले की, तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी महादेव मंदिर विकासासाठी तीन कोटींचा निधी मंजुर केला होता. परंतू ते पदावरून गेले आणि तेथे दुसरे मुख्यमंत्री आले.

अशोकराव चव्हाण यांचे नाव न घेता त्यांनी तीन कोटींचा निधी रद्द केल्याचे सांगितले. मंदिर विकास कामात खोटे बोलणारे आणि निधी रद्द करणारे पदावर राहीले नाही. असे हे जाजवल्य देवस्थान आहे. त्यामुळे कोणीही विकास कामात खोडा घालू नये. असेही त्यांनी स्पष्ट केले.     

       आमदार डॉ. तुषार राठोड बोलताना म्हणाले की, बोरी महादेव मंदिर  हा माझ्या मतदारसंघात होता. त्यामुळे तत्कालीन आमदार चिखलीकर यांना विकास निधी आणण्यासाठी अडचणी येत होत्या.

परंतू आता ते नांदेडचे खासदार झाल्याने आमच्या दोघांच्याही मतदारसंघात हे महादेव मंदिर येत असल्याने केंद्राचा विकास निधी त्यांनी आणतील  आणि मी राज्याचा निधी आणून आम्ही दोघे मिळून विकास कामे करणार असल्याचे त्यांनी सांगितले. यापूर्वी रस्त्याच्या कामासाठी पन्नास लाखाचा निधी दिला होता.

पुढेही विकास कामासाठी निधी देणार असल्याचे त्यांनी सांगितले.     

       या कार्यक्रमास उपनगराध्यक्ष महोम्मद जफरोद्दीन, कंत्राटदार सुमित मोरगे,  बाबुराव केंद्रे,भाजप तालुकाध्यक्ष भगवान राठोड,  राम सावकार मुखेड, शंकरराव नाईक, कृष्णा पापीनवार, प्राचार्य किशन डफडे, प्रकाश तोटावाड,

भालचंद्र नाईक, सा.बा.चे उप अभियंता जोशी, उप कार्यकारी अभियंता वाघमारे, पाणीपुरवठ्याचे उप अभियंता डिकडे, शाखा अभियंता पवार, शाखा अभियंता केंद्रे, कंत्राटदार शिवराज पाटील कळकेकर, देवानंद सांगावे, दिगंबर कावलगावे, डॉ. संजय केंद्रे उपस्थित होते. प्रास्ताविक व सुत्रसंचलन बालाजी झुंबड यांनी केले. तर आभार गजानन कावलगावे यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *