Post Views: 45
नांदेड ;प्रसिद्ध साहित्यिक श्री.अशोक कुबडे यांची “गोंडर”ही बारा बलुतेदारीवर भाष्य करणारी ,सामाजिक आशयाची ग्रामीण कादंबरी प्रकाशनासाठी सिद्ध झाली आहे.
इसाप प्रकाशनाचे संचालक श्री.दत्ता डांगे यांनी ही कांदबरी मानधनासह स्वीकारली आहे.श्री.अशोक कुबडे यांची “गोंडर ” ही कादंबरी सध्या महाराष्ट्रात धुमाकुळ घालत आहे.या प्रसंगी साहित्यिका रूचिरा बेटकर, साहित्यिका सौ.अंजली कानिंदे मुनेश्वर, साहित्यिका सौ.रूपाली वागरे वैद्य, यांनी भेट घेतली. आणि त्यांचा सत्कार करून “गोंडर ” कादंबरीच्या प्रकाशन सोहळ्यासाठी , कादंबरीच्या सुयशासाठी मनस्वी शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगाचे औचित्य साधुन चौफेर साहित्यिक चर्चा ही झाली.आदरणीय कुबडे सरांचे मोलाचे मार्गदर्शन ही आम्हांस मिळाले.