कंधार लोहा तालुक्यातील जनतेने हजारोच्या संख्येने भारत जोडो यात्रेत सहभागी व्हावे असे आव्हान बालाजी रामराव पांडागळे यांनी केले आहे.
काँग्रेसचे राष्ट्रीय नेते खा. राहुल गांधी यांनी लोकशाही भारतीय संविधान जातीयवादी भाजप पासून वाचवण्यासाठी कन्याकुमारी ते काश्मीर पर्यंत भारत जोडो यात्रा सुरू केले आहे. केंद्रातील भाजप प्रणित मोदी सरकार सर्वच आघाड्यावर अपयशी ठरले आहे. देशात महागाई बेरोजगारी प्रचंड प्रमाणात वाढली आहे. या मोदी सरकारच्या विरोधात काँग्रेसचे राष्ट्रीय नेते खासदार राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रा काढून जन आंदोलन सुरू केले असून या भारत जोडो यात्रेला देशात प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्यात राहुल गांधी यांची यात्रा दिनांक 9 नोव्हेंबर रोजी दाखल होणार असून ही भारत जोडो यात्रा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली नांदेड जिल्ह्यात भारत जोडे यात्रेची जयत तयारी करण्यात करण्यात आली आहे. या भारत जोडो यात्रेत लाखोंच्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन काँग्रेस पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते बालाजी रामराव पांडागळे यांनी केले आहे. यावेळी रामभाऊ सोनावळे माजी उपसभापती कंधार, शिरडून नगरीची पोलीस पाटील भगवानराव, माली पाटील व्यंकटराव पांडागळे,किशनराव लोंढे,उत्तमराव वडवले, आलेगावचे गावचे सरपंच बळवंत पाटील, राजेश्वर डांगे ,नरेश शिंदे ,संजय पाटील, संजय शिंदे तंटामुक्ती अध्यक्ष ,दाताळा, माधवराव अंदुरे यांचीउपस्थिती होती.